पारनेर | नगर सह्याद्री पारनेर नगरपंचायतीच्यावतीने गुरुवारी उपनगराध्यक्षांसह सर्व पदाधिकारी व अधिकार्यांनी पारनेर नगरपंचायतीचा प्रारूप विका...
पारनेर नगरपंचायतीच्यावतीने गुरुवारी उपनगराध्यक्षांसह सर्व पदाधिकारी व अधिकार्यांनी पारनेर नगरपंचायतीचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३(१) अन्वये पारनेरनगरपंचायतीची विकास योजना तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्या अनुषंगाने सहायक संचालक, नगर रचना, अहमदनगर शाखा यांनी नगरपंचायतीचे सर्वेक्षण करुन आस्तित्त्वातील जमीन वापर नकाशा (इएलयू) विहीत मुदतीत तयार करुन अहवाल नगरपंचायतीस हस्तांतरीत केला आहे. प्रारूप विकास योजनेमध्ये नकाशे नियोजन प्रभागाच्या हद्दीसह, प्रारूप विकास योजने संबंधीचा सविस्तर अहवाल ज्यात ही योजना तयार करण्यामागील उद्देश, शहराची नियोजनबद्ध वाढ व्हावी यासाठी प्रस्तावित केलेल्या सुविधांचा तपशिल, विकास योजनेतील प्रस्तावांच्या अंमलबजावणी बाबत विवेचन, प्रस्तावाखालील जमीन भूसंपादन व विकासावर होणारा खर्च याबाबतचे विवरण व कालबध्द कार्यक्रम आणी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली इत्यादी बाबी समावेश आहे.प्रारूप विकास योजना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील विकास योजना संबंधिच्या सर्व तरतुदींचे पालन करुन तयार केली आहे. उक्त अधिनियमाचे कलम २६ (१) अन्वये प्रसिद्ध करण्यासाठी विशेष सभेत मंजूर करण्यात आली आहे. प्रारूप विकास योजना पारनेर नगरपंचायत कार्यालय व सहायक संचालक, नगर रचना, अहमदनगर शाखा, अहमदनगर या दोन ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे. योजनांवर हरकतीसाठी ३० दिवस मुदत आहे.
COMMENTS