जिल्हा बँक उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे यांची माहिती ः २५ हजारांवर शेतकर्यांच्या खात्यात रक्कम वर्ग अहमदनगर | नगर सह्याद्री राज्य शासना...
जिल्हा बँक उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे यांची माहिती ः २५ हजारांवर शेतकर्यांच्या खात्यात रक्कम वर्ग
अहमदनगर | नगर सह्याद्रीराज्य शासनाने राज्यातील शेतकर्यांना दिलासा देणेसाठी सन २०१७-१८, २०१८-१९ व सन २०१९-२० या कालावधीत नियमीत परतफेड केलेल्या शेतकरी सभासदांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे यांनी दिली.
सदर योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांचा १७७२६९ कर्ज खात्याची माहिती शासकीय लेखापरिकांकडून तपासणी करून शासन पोर्टलवर अपलोड केलेला आहे. सदर माहितीचे शासनस्तरावर संगणकीय संस्करण होऊन पात्र शेतकरी सभासदांपैकी ३२६०१ शेतकरी सभासदांची पहिली यादी शासन पोर्टलवर आधार प्रमाणिकरण करणेसाठी दि. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिध्द झालेली असून जिल्हयातील ३१९२० शेतकरी सभासदांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशी माहीती बँकेचे उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे यांनी दिली. ते पूढे म्हणाले की, शासनामार्फत नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळालेले शेतकर्यामध्ये मोठया प्रमाणावर जिल्हा सहकारी बँकेचे कर्जदार सभासद असून बँकेचे शेती विकासासाठी जिल्ह्यात सिंहाचा वाटा असुन आज रोजी जिल्ह्यातील २५४१८ कर्जदार शेतकरी सभासदांना जिल्हा बँकेच्या त्यांच्या खाती रक्कम ९० कोटी ९३ लाख प्रोत्साहनपर लाभाची रक्कम जमा झाली असल्याचीही माहिती बँकेचे व्हाईस चेअरमन अँड. कानवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगीतले.
तसेच सन २०२२-२३ सालात बँकेने खरीप हंगामात ३६४६९९ शेतकर्यांना रक्कम रू.२७१६.५६ कोटीचे अल्पमुदत पिक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. तसेच प्रोत्साहनपर लाभ योजनेतील उर्वरीत ६४४ शेतकरी सभासदांना आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पुर्ण करून घ्यावी असेही त्यांनी नमुद केले आहे.
COMMENTS