ब्ल्यु जेम फौंडेशन आयोजित मोफत अस्थिविकार आणि फिजिओथेरपी शिबिरास प्रतिसाद अहमदनगर | नगर सह्याद्री आज आरोग्य सेवा महाग होत असल्याने अनेक रुग...
ब्ल्यु जेम फौंडेशन आयोजित मोफत अस्थिविकार आणि फिजिओथेरपी शिबिरास प्रतिसाद
अहमदनगर | नगर सह्याद्रीआज आरोग्य सेवा महाग होत असल्याने अनेक रुग्ण आपल्या छोटया-मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे भविष्यात हा आजार बळावतो. त्यासाठी सामाजिक संस्थांनी हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत शिबीरांचे आयोजन करुन ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा देण्याचे काम करणे गरजेचे आहे. या भावनेतून विविध समाजोपयोगी उपक्रम ब्ल्यु जेम फौंडेशनच्यावतीने मागील १० वर्षांपासून राबविले जात आहेत. ग्रामीण परिसरातील लोकांना उच्च दर्जाचे आणि आधुनिक उपचार भेटावे या उद्धेशाने या शिबिराचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन फौंडेशनच्या अध्यक्षा निलम परदेशी यांनी केले.
नगर येथील ब्ल्यु जेम फौंडेशन व मातोश्री सेवा प्रतिष्ठान श्रीगोंदा आणि संचेती इन्स्टिटयूट फार ऑर्थोपेडिकस अँड रिहॅबिलिटेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत अस्थिविकार व फिजिओथेरपी शिबीर मातोश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल श्रीगोंदा येथे संपन्न झाले. यावेळी संचेती इन्स्टिटयूटचे डॉ.अनुज दोषी, डॉ.स्वप्नील जाधव, फिजिओथेरपिस्ट डॉ.सागरिका पाठक, डॉ.तन्वी चव्हाण, ब्ल्यु जेम फौंडेशनच्या अध्यक्षा निलम परदेशी, सचिव राजेश परदेशी, प्रतिष्ठानचे डॉ.विक्रम भोसले आदि उपस्थित होते.
यावेळी संचेती हॉस्पिटलचे राहुल चोभे म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्यसंदर्भात चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पुढील काळात अशा शिबिराचे नियोजन केले जाईल असे सांगितले.
यावेळी फिजिओथेरपिस्ट डॉ.सागरिका पाठक आणि डॉ.तन्वी चव्हाण यांनी आपण दैनंदिन जीवनात घराच्या घरी काही महत्वाचे व्यायाम योग्य प्रकारे करून आपल्या वेदना कमी करू शकतो या संदर्भात यांनी मार्गदर्शन केले या शिबिरात श्रीगोंदा, कर्जत, काष्टी या परिसरातील १५० हुन अधिक रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी मातोश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीनेअल्पदरात एस रे तपासणी सुविधा उपलब्ध करण्यात आली. या शिबिरासाठी प्रतिष्ठानचे डॉ.सुजाता भोसले, अरविंद कासार, अक्षय ओहळ, समाधान कोंडलकर यांनी परिश्रम घेतले. शेवटी राजेश परदेशी यांनी सर्वांचे आभार मानले.
COMMENTS