निघोज । नगर सह्याद्री - गेल्या दहा वर्षांपासून दूधव्यवसाय माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन दूधउत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने पाठ...
निघोज । नगर सह्याद्री -
गेल्या दहा वर्षांपासून दूधव्यवसाय माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन दूधउत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने पाठबळ देणारे बालाजी दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुणशेठ लंके यांनी पारनेर तालुक्यातील निघोज,लोणी मावळा, म्हस्केवाडी, मांडवा खुर्द, खडकवाडी, शिंदेवाडी या परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर ५० पैसे प्रमाणे पंचवीस लाख रुपये रोख रक्कम देण्याचा कार्यक्रम निघोज येथील बालाजी डेअरी फार्म येथे शुक्रवार दि.२१ रोजी संपन्न झाला आहे. यावेळी गावोगावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रकाश शेंडकर, अनंत पानमंद, किरण शेंडकर, अमोल चौधरी,सौरव पवार, भैरवनाथ पतसंस्थेचे अधिकारी बाबाजी वाघमारे, दैनिक नगर सह्याद्री प्रतिनिधी दत्ता उनवणे, प्रेस फोटोग्राफर जयसिंग हरेल,दूध उत्पादक शेतकरी विनायक सोनवणे,गणेश गोरडे, कैलास सरोदे, शिवनाथ देशमुख, नामदेव मावळे, संतोष मावळे, राजू लामखडे,चंदर पावडे, विठाबाई लामखडे, मोहम्मद सय्यद, संतोष पानमंद, कांताबाई फुले, संपत गोरडे, विकास वाघुले, ज्ञानेश्वर खेमनार, सुभाष खेमनार, राजेंद्र खेमनार, केशवती खुशवाह, अर्जुन भगत, अशोक शिंदे, बाळासाहेब औटी, लक्ष्मण करांडे, जालिंदर टेकुडे, दत्ता काळे, संजय आहेर, प्रदिप शिंदे, सोपान श्रीदत्त विलास शिंदे, सुदाम आहेर यांना प्रतिनिधीक स्वरुपात यावेळी धनादेश व रोख रक्कम सुपुर्द करण्यात आली आहे. तसेच बालाजी दूध उद्योग समूहाचे अधिकारी व कर्मचारी यांना बोनस स्वरुपात रोख रक्कम तसेच मिठाई बॉक्स देण्यात आले.
बालाजी दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुणशेठ लंके यावेळी म्हणाले गेली अनेक वर्षांपासून आपण व आपले सहकारी दूध व्यवसाय करताना कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके व कार्यकारी संचालक मच्छींद्रशेठ लंके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहोत.यावर्षी शेतीमालाला भाव नाही, ओला दुष्काळ आहे.शेतकऱ्यांना दूध उत्पादन हाच एक जोडधंदा असा आहे की दूधाच्या माध्यमातून आठ ते पंधरा दिवसांनी रोख पैसे येण्याचा मार्ग आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर अति पावसामुळे अस्मानी संकट आले आहे. दरवर्षी आपण बोनसच्या माध्यमातून बालाजी डेअरी फार्म या उद्योग व्यवसाय माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देत असतो यावर्षी सुद्धा पारनेर तालुक्यातील पंधरा ते वीस गावांतील दूध उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीस लाख रुपयांचा रोख तसेच धनादेश माध्यमातून बोनस दिला असून व्यवसाय करताना सामाजिक उद्देश ठेवण्याची गरज आहे.त्याच भावनेतून आपण शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचे काम करीत असल्याची माहिती लंके यांनी दैनिक नगर सह्याद्रीशी बोलताना दिली आहे.
COMMENTS