नगरसेवक मनोज कोतकर यांची औषध फवारणी करण्याची आयुक्तांकडे मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत...
नगरसेवक मनोज कोतकर यांची औषध फवारणी करण्याची आयुक्तांकडे मागणी
अहमदनगर | नगर सह्याद्री
केडगाव उपनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मोकळ्या जागेत ठिकठिकाणी पाणी साचले आहे त्यामुळे साथीचे आजार पसरले आहेत. डेंगू सुदृढ, मलेरिया, टाईफड व इतर साथीच्या आजारचे रुग्ण वाढलेले दिसत आहे. महापालिका आरोग्य विभागाने कुठल्याही उपाययोजना आतापर्यंत केलेल्या दिसत नाही. नागरिकांमध्ये साथीच्या आजारा संदर्भात जनजागृती करणे गरजेचे असते मात्र आरोग्य विभागाने अक्षरशः नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे डेंग्यू मलेरिया टाईफड रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शयता नाकारता येत नाही.
केडगाव परिसरातील कायनेटिक चौक, नगर दौंड , देवी रोड, अमरधाम रोड, सोनेवाडी रोड, नगर पुणे रोड, केडगाव उपनगरातील आदी भागातील परिसरामध्ये गवताचे प्रमाण वाढले आहे,पावसाचे डबके ही साचले आहेत मनपा आरोग्य व मलेरिया विभागाने औषध फवारणी करणे गरजेचे असतानाही आतापर्यंत कुठल्याही उपाययोजना केलेले नाहीत. आरोग्य विभागाशी संपर्क साधला असतानाही औषध फवारणी झालेली नाही. यावरून असे दिसते की आरोग्य विभागाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्याची कुठलीही काळजी घेतलेली दिसत नाही तरी आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी स्वतः लक्ष घालून साथीचे व डेंगू सुदृढ मलेरिया आजारावर उपायोजना कराव्यात अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
COMMENTS