श्रीरामपुर । नगर सह्याद्री - श्रीरामपूर येथील मुख्य संशयित आरोपी मुल्ला कटरस याच्यासह सहा जणांवर मोक्काची कारवाई केली आहे. घडलेल्या लवजिहा...
श्रीरामपुर । नगर सह्याद्री -
श्रीरामपूर येथील मुख्य संशयित आरोपी मुल्ला कटरस याच्यासह सहा जणांवर मोक्काची कारवाई केली आहे. घडलेल्या लवजिहाद प्रकरणामुळे या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास डीवायएसपी संदिप मिटके यांच्याकडे होता. आतापर्यंत सहा संशियत आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे.
इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर हा श्रीरामपूर येथील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्या टाेळीने विविध गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. मुल्ला हा गुंडांच्या मदतीने सर्वसामान्य लोकांना त्रास देत असे. त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालत असते. श्रीरामपूर मध्ये मुल्ला कटरची चांगलीच दहशत होती.
अल्पवयीन मुलींचे अपहरण, जबरदस्तीने धर्मांन्तर करणे, मुलींची विक्री करणे, सामुहिक अत्याचार करणे आणि वेश्या व्यवसायास भाग पाडणे असे गंभीर गुन्हे त्याच्या टाेळीवर दाखल आहे. त्यामुळे पाेलिसांनी मुल्ला कटर, पप्पू गोरे यांच्यासह सहा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केलीआहे.
श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम (1999 चे कलम 3(1),(ii),3(2),3(4) ) प्रमाणे वाढीव कलम लावण्यास मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, पोलीस अधीक्षक नगर यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र यांना पाठवला होता. त्या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिल्याने मुल्ला कट्टर टाेळीवर मोक्का लावण्यात आला आहे.
यामध्ये मुल्ला कटरसह चेंडवाल, पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे शेवगाव येथील वेश्याव्यवसाय चालवणारी एक महिला आणि सचिन मधुकर पगारे यांचा समावेश आहे.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे, पीएसआय सुरवडे, महिला पोलीस नाईक अश्विनी पवार, पोलीस नाईक संतोष दरेकर, पोलीस कॉन्स्टेबल, रवींद्र माळी, विलास उकिरडे यांनी केली आहे.
COMMENTS