मुंबई । नगर सह्याद्री - केंद्रीय निवडणूक आयोगाने काल शिवसेनेला धक्का बसेल असा निर्णय दिला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर शि...
मुंबई । नगर सह्याद्री -
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल शिवसेनेला धक्का बसेल असा निर्णय दिला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात खळबळ माजली आहे. ठाकरे गटाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांना आता धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही, तर शिवसेना हे नावदेखील वापरता येणार नाही. या सगळ्या राजकीय संघर्षात ज्यांनी शिवसेनेची स्थापना केली ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आता काही जुनी भाषणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना या नावाबद्दल काय विचार करायचे आणि त्यासाठी ते किती संवेदनशील होते हे या व्हायरल व्हिडिओतून लक्षात येत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या एका भाषणातील हा व्हिडिओ आहे. ज्यात ते शिवसैनिकांना म्हणतात, मी माझ्या वडिलांनी दिलेला कानमंत्र सांगतोय. तुम्हाला, या तरुण पोरांना सांगतोय. हे लक्षात घ्या, नाव आणि पैसा... 'पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो... पण एकदा का नाव गेलं तर पुन्हा येत नाही... ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचे नाही'. म्हणून नावाला जपा, नाव मोठे करा. मी शिवसेना या नावाला कधी धक्का लावू देत नाही. माझ्याकडून मी ती काळजी घेतो, इतरांनाही घ्यायला सांगतो. कारण, शिवसेना नाव आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. ज्यादिवशी त्याला डाग लागेल तेव्हा तुम्ही-आम्ही संपलो... या व्हिडिओतून दोन्ही गटातील शिवसैनिक काय बोध घेतात हे येणारा काळच ठरवेल.
Video: "पैसा येतो, पैसा जातो पण एकदा नाव गेलं कि पुन्हा येत नाही..."
— Akshay Baisane (अक्षय बैसाणे) (@Baisaneakshay) October 9, 2022
निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा जुन्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल...#Shivsena #BreakingNews #BalasahebThackeray #ViralVideo #ShivsenaBalasahebThackeray #BalasahebThackeraySpeech #Politics pic.twitter.com/5RCN2wZDiP
COMMENTS