मुंबई । नगर सह्याद्री - उद्धव ठाकरे गटाला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा करत दिल्ली हा...
मुंबई । नगर सह्याद्री -
उद्धव ठाकरे गटाला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा करत दिल्ली हायकोर्टात याचिका केली होती. याचिकेत ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह काढून घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, ही याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या 'धगधगती मशाल’ चिन्हावर दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीनेही दावा केला होता. 1996 पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता पक्षाने निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली होती. इतकेच नव्हे तर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणाही पक्षाने केली होती. समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर आक्षेप घेतला होता.
याबाबत राज्य निवडणूक आयोगाने समता पक्षाला उत्तर दिले होते की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेले “मशाल’ हे चिन्ह अंतरिम स्वरूपाचे नाही. अंधेरी पोटनिवडणुकीनंतर त्याच्या पुनर्वाटपाबाबत विचार केला जाऊ शकतो. मात्र, या उत्तरावर समाधान न झाल्याने समता पक्षाने निवडणूक आयोगाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.
COMMENTS