मुंबई । नगर सह्याद्री - उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी काही संपत नाही आहे. अंधेरी पोटनिवडणूक तोंडावर आली असताना, पक्षाच्या उमेदवार ऋतुजा ल...
मुंबई । नगर सह्याद्री -
उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी काही संपत नाही आहे. अंधेरी पोटनिवडणूक तोंडावर आली असताना, पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा महापालिकेतील राजीनामा अजून मंजूर झालेला नाही. दुसरीकडे पक्षाला मिळालेल्या नवीन चिन्हावर सुद्धा आता समता पार्टीने दावा केला आहे. मशाल चिन्ह आमचे आहे असा दावा समता पार्टीच्या नेत्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला दिलेलं मशाल हे निवडणूक चिन्ह आपले असल्याचा दावा समता पार्टीने केला आहे. १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. यावर आज निर्णय अपेक्षित असून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवार देणार असल्याची घोषणाही समता पार्टीने केली आहे.
समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी मशाल चिन्ह आपले असल्याचा दावा केला आहे. २००४ मध्ये समता पक्षाची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह बहाल केले आहे. असं देवळेकर यांनी म्हटले आहे.
मशाला चिन्हासाठी आपण निवडणूक आयोगाला इमेल पाठवून चिन्हावर हक्क सांगितला असल्याचे देवळेकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला बहाल केलेलं मशाल हे चिन्हही आता जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिंदे आणि ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच दोन्ही गटाकडून आता उमेदवार सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना तर भाजप-महायुतीकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
COMMENTS