मुंबई । नगर सह्याद्री - अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी आरोप केले आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेण्यासाठी अपक्ष उमेदवारांवर ठा...
मुंबई । नगर सह्याद्री -
अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी आरोप केले आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेण्यासाठी अपक्ष उमेदवारांवर ठाकरे गटाकडून दबाव आणला जात होता. असा आरोप अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केला आहे.
याबाबत मिलिंद कांबळे यांनी निवडणूक आयोगालाही एक पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. पत्रात ऋतुजा लटके यांच्यासोबत असलेले सहकारी मला धमकी देत होते. असा आरोप कांबळे यांनी केला आहे.
निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना मिलिंद कांबळे यांनी ठाकरे गटाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याने आता आयोग यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा ऋतुजा लटके यांनीदेखील व्यक्त केली होती. तसेच, अपक्ष उमेदवारांना माघार घेण्याचेही आवाहन केले होते. मात्र, सहा ते सात अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे.
अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी पत्रपरिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. ऋतुजा लटके यांच्या सहकाऱ्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, म्हणून मला धमकावले आहे. माझ्यावर दबाव टाकला आहे. आपण याबाबत निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल केली आहे. आयोग यावर नक्की कारवाई करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात येत्या 3 नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून निवडणूक शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडेल, असा विश्वास निधी चौधरींनी व्यक्त केला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
COMMENTS