मुंबई । नगर सह्याद्री - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. देशमुख यांना वैद्यकीय उपचारा...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. देशमुख यांना वैद्यकीय उपचारासाठी न्यायालयाने परवानगी देण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात असणाऱ्या देशमुखांनी उपचारासाठी रुग्णालयामध्ये जाण्याची परवानगी मागितली होती.
त्यांची ही मागणी आता मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केली असून जसलोक रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार करण्यात येणार आहे. तर जसलोक रुग्णालयामध्ये अॅजिओग्राफी करण्यात येणार असल्याची माहीती समोर येत आहे. न्यायालयाकडून देशमुखांना आज दुसरा दिलासा दिला आहे. कारण मागील काही दिवसांमध्ये देशमुख यांना ईडीच्या गुन्ह्यातून त्यांना जामीन मिळाला होता. परंतु सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात मात्र त्यांना जामीन मिळालेला नसल्यामुळे ते तुरुंगामध्येच आहे. अशातच आता न्यायालयाकडून उपचारासाठी परवानगी दिली आहे.
COMMENTS