मुंबई । नगर सह्याद्री - निवडणूक आयोगाने शिवसेनेसाठी मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. ...
मुंबई । नगर सह्याद्री -
निवडणूक आयोगाने शिवसेनेसाठी मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाला शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) असे नाव देता येऊ शकते. यातून शिवसेना उलट अधिक जोमाने उभी राहील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार आज औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, निवडणूक चिन्ह गोठवले म्हणून शिवसेना अजिबात संपणार नाही. उलट शिवसेना आणखी जिद्दीने उभी राहील. नवीन युवा पिढी जिद्दीने पक्षाला पुढे नेतील. काँग्रेसमध्येही यापूर्वी नावात बदल झाले आहे. काँग्रेस आणि काँग्रेस आय असे नामकरण झाले होते. त्याचप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) असे नाव वापरता येईल.
निवडणू आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले, यावर शरद पवार म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. हे होणार याची मला खात्री होती. निर्णय कोण घेते, याची मला माहिती नाही. हे घडेल असे माझे मन मला सांगत होते. यापुढे निवडणुकीला सामोरे जायचे असेल आणि एखादी शक्तिशाली संघटना असेल तर त्याचे चिन्ह राहीलच असे काही सांगता येत नाही.
शरद पवार म्हणाले की, मी स्वतः पहिली निवडणूक बैलजोडी या चिन्हावर, दुसरी निवडणूक गाय वासरू चिन्हावर, तिसरी निवडणूक चरखा, चौथी निवडणूक पंजा आणि आता राष्ट्रवादी चिन्हावर निवडणुका लढवल्या आहे. त्यामुळे चिन्हाचा काहीही परिणाम होणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, या निर्णयामुळे महाविकास आघाडीवरही काहीही परिणाम होणार नसल्याचे शरद पवार म्हणाले आहे.
COMMENTS