मुंबई । नगर सह्याद्री अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. यांवर राज्याचे...
मुंबई । नगर सह्याद्री
अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. यांवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भर सभेत प्रतिक्रिया दिली आहे. या परिस्थितीत आम्हाला हस्तक्षेप करणे भाग आहे. उद्या 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करण्याचे आदेश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहे. हायकोर्टाच्या या निर्णयावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार सभेत असताना त्यांना हायकोर्टाच्या निर्णयाची बातमी कळाली आहे. त्यावर बोलतानां त्यांनी म्हटले की, नेहमी सत्याचाच विजय होत असतो हे लक्षात ठेवा. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऋतुजा लटकेंना यांचा राजीनामा मंजूर करा आणि त्यांना निवडणूक लढू द्या असे कोर्टाने सांगितले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने राजीनामा प्रकरणी ऋतुजा लटके यांना दिलासा दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. शिवसेना शाखा क्रमांक 79 या ठिकाणी शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू असून उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या ठिकाणी फटाके फोडून मिळण्याचे स्वागत देखील करण्यात आले आहे.
COMMENTS