मुंबई । नगर सह्याद्री - दिवाळीच्या तोंडावर मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) ने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छ...
मुंबई । नगर सह्याद्री -
दिवाळीच्या तोंडावर मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) ने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त केला आहे. सणासुदीच्या काळात गोड पदार्थ आणि खाद्यतेलात भेसळ होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
दिवाळीत मिठाईला मोठी मागणी असते. मात्र जास्त नफ्याच्या नादात भेसळयुक्ती मिठाई विकण्याचा प्रयत्न केला जात होता. सणासुदीच्या काळात असा प्रकार वाढतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागही सतर्क होतो.
आज मुंबईत अन्न आणि औषध प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेत १ कोटी ४ लाख १४ हजार ११ रुपयांचे भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. १९ सप्टेंबर रोजी FDA ने राबवलेल्या विशेष मोहिमेत पेढ्यातील अन्नपदार्थाचे नमुने घेण्यात आले होते.
भेसळयुक्त मिठाई कशी ओळखाल?
>> मिठाई किंवा खवा तळहातावर घेऊन रगडा. तो जर कोरडा न होता तेलकट वास आला तर भेसळ समजावी.
>> मिठाईचा तुकडा तोंडात टाकताच तेलकट वाटला तर त्यात भेसळ असू शकते.
>> मिठाई व खव्यावर तीनचार आयोडिनचे दोन थेंब टाका. भेसळ नसल्यास त्यावर काहीच परिणाम होणार नाही. भेसळ असल्यास थेंबाची जागा काळसर होईल.
>> मिठाई व खव्यावर हायड्रोक्लोरिक अॅसिड टाका. मिठाईचा रंग जांभळा झाल्यास त्या मिठाईत मिटॅनिल हे रसायन वापरल्याचे सिद्ध होईल.
>> भेसळयुक्त मिठाई खाल्ल्यानंतर काही वेळात मळमळ, उलटी व जुलाब सुरू होतात.
COMMENTS