मुंबई । नगर सह्याद्री - दिवाळी २ दिवसांवर आली असताना दुर्घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या मुरैना येथील फटाक्यांच्या अवैध गोदामात झालेल्या स्फ...
मुंबई । नगर सह्याद्री -
दिवाळी २ दिवसांवर आली असताना दुर्घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या मुरैना येथील फटाक्यांच्या अवैध गोदामात झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला आहे. स्फोट इतका जोरदार होता की, ज्या इमारतीत फटाके बनवले जात होते ती इमारत पूर्णपणे कोसळली. फटाके बनवणारे अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. बनमोर शहराजवळील जैतपूर गावात ही दुर्घटना घडली आहे.
गंभीर जखमींना मुरैना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी इमारतीमध्ये स्फोट झाला, त्यावेळी बांधकामाचे काम सुरू होते. अचानक झालेल्या स्फोटात संपूर्ण घर जळून खाक झाले आणि 7 जण गंभीर भाजले. माहितीवरून एसडीओपी आणि टीआय वीरेश कुशवाह हे टीमसोबत घटनास्थळी गेले आहे.
COMMENTS