मुंबई । नगर सह्याद्री - शहाजीबापू पाटील यांनी वक्तव्य केले आहे. की दोन राऊतांवर माझा लई राग आहे आमचे सगळे वाटोळे या दोन राऊतांनी केले आहे. ...
मुंबई । नगर सह्याद्री -
शहाजीबापू पाटील यांनी वक्तव्य केले आहे. की दोन राऊतांवर माझा लई राग आहे आमचे सगळे वाटोळे या दोन राऊतांनी केले आहे. आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात दरी पडली, त्यात या दोन्ही राऊतांचा मोठा वाटा आहे. तसेच, या दोघांसोबतच आणखी दोघे-तिघे यासाठी कारणीभूत असल्याची टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.
ऐतिहासिक परंपरा असलेल्या चिन्हावर शिखांनी दावा टाकणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे. सिंधुदुर्गात एका कार्यक्रमासाठी शहाजी पाटील आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या चिन्हावर शीख समुदायाने घेतलेल्या आक्षेपावर बोलताना हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले,आज शिखांनी आक्षेप घेतला उद्या राजस्थान मधील राजपूत, कर्नाटकातील रेड्डी म्हणतील भावना दुखावल्या. ढाल तलवार हे आमचे चिन्ह आहे.
राज्याच्या हितासाठी व कल्याणासाठी भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे अशी युती व्हावी असे मत शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले आहे. सिंधुदुर्गात एका कार्यक्रमासाठी आलेले शहाजीबापू पाटील यांनी अशी युती होऊ शकते आणि राज्याच्या हितासाठी व कल्याणासाठी अशी युती निश्चितपणे व्हावी असे म्हटले आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला का सोडले असे विचारले असता शहाजी पाटील म्हणाले की, या जागेवर युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडणूक लढवणार आहे. गेले तीन महिने त्यांनी चांगली काम केलेले असून मागील निवडणुकीत त्यांना चांगली मते मिळाली होती. त्यामुळे ही जागा भाजपला देण्यात आली अशी माहिती शहाजी पाटील यांनी यावेळी दिली आहे.
COMMENTS