मुंबई । नगर सह्याद्री - बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आज पिक विमा कंपन्याचे कार्यालय फाेडले आहे. आमदार बांगर आणि त...
मुंबई । नगर सह्याद्री -
बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आज पिक विमा कंपन्याचे कार्यालय फाेडले आहे. आमदार बांगर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली शहरातील एनटीसी परिसरात असलेल्या पिक विमा कंपनीच्या कार्यालयातील साहित्याची केली तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेपुर्वी आमदार संतोष बांगर हे शहरातील पिक विमा कंपनीच्या कार्यालयाचा शोध घेत हाेते. पिक विमा कंपनीचे प्रतिनिधीच्या शाेधात ते हाेते. हे प्रतिनिधी शेतक-यांना वेळेत भेटत नाही. ते सापडत नसल्यामुळे बांगर संतापलेले हाेते. त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना देखील कार्यालयात बसून ठेवले होते.
आमदार बांगर हे हिंगोली शहारातील एनटीसी परिसरात पाेहचताच पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी गायब असल्याची चर्चा हाेती. आमदार बांगर कार्यालयात पोहचले आहे. तेथे त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ताेडफाेड केली आहे. त्यानंतर शेकडो शेतकऱ्यांचा जमाव घेऊन आमदार संतोष बांगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले आहे.
COMMENTS