मुंबई । नगर सह्याद्री - अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना हायकोर्टाने मोठा दिलासा मिळाला आहे. या परिस्थिती...
मुंबई । नगर सह्याद्री -
अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना हायकोर्टाने मोठा दिलासा मिळाला आहे. या परिस्थितीत आम्हाला हस्तक्षेप करणे भाग आहे. उद्या 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करण्याचे आदेश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने राजीनामा प्रकरणी ऋतुजा लटके यांना दिलासा दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेना शाखा क्रमांक 79 या ठिकाणी शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू असून उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या ठिकाणी फटाके फोडून मिळण्याचे स्वागत देखील करण्यात आले आहे.
ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबरला तातडीने राजीनामा स्वीकारावा असा अर्ज केला होता. महापालिका आयुक्त हे विशेष प्रकरणात राजीनामा अर्ज स्वीकारू शकतात. मात्र हे प्रकरण नियमाला धरून नाही, असा युक्तीवाद महापालिकेच्या वकिलांनी केला आहे.
आयुक्तांनी नोटीस कालावधी माफ करण्याचा आपला विशेषाधिकार विशिष्ट पद्धतीने वापरावा, असे हायकोर्ट सांगू शकत नाही. जोपर्यंत राजीनामा स्वीकारला जात नाही तोपर्यंत कर्मचारी पालिकेच्या सेवेतच असतो. एक महिना नोटीसच्या कालावधीतही आयुक्तांना निर्णय घेण्याचा अधिकार असतो, असाही युक्तीवाद पालिकेच्या वकिलांनी केली आहे.
COMMENTS