मुंबई । नगर सह्याद्री - दिवाळी दोन दिवसांवर आली आहे. सणासुदीच्या काळात सोने हमखास खरेदी केले जाते. दिवाळीच्या काळात अनेक शुभ मुहूर्त असल्या...
मुंबई । नगर सह्याद्री -
दिवाळी दोन दिवसांवर आली आहे. सणासुदीच्या काळात सोने हमखास खरेदी केले जाते. दिवाळीच्या काळात अनेक शुभ मुहूर्त असल्यामुळे सोन खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच यानंतरच्या काळात लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे सोने खरेदीत वाढ होत आहे.
सोन्याचे भाव कधी उच्चांक गाठतात तर कधी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे असतात. आज आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदा बाजरातील सोन्या-चांदीच्या दरांमध्ये बदल झाले आहे.
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,350 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,560 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 561 रुपये आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
चेन्नई - 51,110 रुपये
दिल्ली - 50,730 रुपये
हैदराबाद - 50,560 रुपये
कोलकत्ता - 50,730 रुपये
लखनऊ - 50,950 रुपये
मुंबई - 50,560 रुपये
नागपूर - 50,590 रुपये
पुणे - 50,590 रुपये
COMMENTS