मुंबई । नगर सह्याद्री - मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बिल्डर पारसभाई पोरवाल यांनी आज सकाळी ७ च्या सुमारास आत्महत्या के...
मुंबई । नगर सह्याद्री -
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बिल्डर पारसभाई पोरवाल यांनी आज सकाळी ७ च्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पारसभाई पोरवाल हे काळाचौकी परिसरातील शांतीकमल टॉवरमध्ये राहतात.
याच इमारतीच्या २४ व्या माळ्यावरुन उडी घेत त्यांनी आत्महत्या केली आहे. पारसभाई पोरवाल यांना आर्थिक अडचण होती त्याच टेन्शनमध्ये असलेल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
शिवाय पोरवाल यांनी आत्महत्या करण्याआधी लिहिलेली सुसाइड नोट देखील पोलिसांना सापडली असून या प्रकरणाचा अधिकचा तपास मुंबई पोलिस करत आहे. दरम्यान, शांतीकमल टॉवरमधील वरचे तीनही माळे पोरवाल यांच्या नावावर असल्याचे देखील समजते आहे.
COMMENTS