मुंबई । नगर सह्याद्री - शिवसेना नेते तसेच खासदार संजय राऊत सध्या पत्राचाळ प्रकरणात तुरुंगामध्ये आहे. आज म्हणजेच १० ऑक्टोबर रोजी त्यांच्या ज...
मुंबई । नगर सह्याद्री -
शिवसेना नेते तसेच खासदार संजय राऊत सध्या पत्राचाळ प्रकरणात तुरुंगामध्ये आहे. आज म्हणजेच १० ऑक्टोबर रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. थोड्याच वेळात या सुनावणीला सुरूवात होणार असून आज राऊतांना जामीन मिळणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
सध्या संजय राऊत हे अर्थर रोड जेलमध्ये आहे. यापूर्वी अनेकदा त्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. मागील सुनावणीच्या वेळी राऊत यांच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण करत त्यांना जामीन देण्यात यावा अशी विनंती कोर्टाकडे केली होती. त्यानंतर ईडीच्या वकिलांकडून न्यायालयात वेळ मागण्यात होती.
न्यायालयाने युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर याबाबतची सुनावणी १० ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, आज संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान आजच्या सुनावणीतत राऊत यांना दिलासा मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गोरेगावमध्ये गुरू आशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. कंपनीशी संबंधित प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी येथील एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला आहे.
यामध्ये जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. प्रवीण राऊत यांनी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केल्याचेही समोर आले आहे. या पैशांचा स्त्रोत काय, याचा शोधही ईडी घेत आहे. या संपूर्ण घोटाळ्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
COMMENTS