मुंबई । नगर सह्याद्री - दुचाकीला वाहनाला अचानक आग लागल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कल्याणमध्ये एका धावत्या दुचाकीने अचानक पेट ...
मुंबई । नगर सह्याद्री -
दुचाकीला वाहनाला अचानक आग लागल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कल्याणमध्ये एका धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतला आहे. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आहे. कल्याणहून डोंबिवलीकडे हा दुचाकीस्वार जात होता. कल्याणच्या सर्वोदय मॉल परिसरात ही घटना घडली आहे.
चालत्या गाडीने अचानक पेट घेतल्याने आजूबाजूच्या वाहन चालकांमध्ये गोंधळ उडाला आहे. या आगीत दुचाकी जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
Video: कल्याणमध्ये चालत्या दुचाकीला आग#Kalyan #Fire #BurningBike #Accident #ViralVideo #MarathiNews #KalyanNews #KalyanDombivli
— Akshay Baisane (अक्षय बैसाणे) (@Baisaneakshay) October 9, 2022
Video Credit: Pradip Bhange pic.twitter.com/3aGo95f3v0
COMMENTS