मुंबई । नगर सह्याद्री - नाशिकमध्ये बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडला आहे. भिमाशंकर येथे देखील प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्य...
मुंबई । नगर सह्याद्री -
नाशिकमध्ये बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडला आहे. भिमाशंकर येथे देखील प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. श्री क्षेत्र भिमाशंकरला भाविकांच्या बसला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. भिमाशंकर रोडवर शिंदे वाडी येथे ही घटना घडली आहे. कल्याण वरुन २९ प्रवाशी घेऊन जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसला अचानक आग लागली आहे.
या आगीने काहीच वेळात रौद्र रूप धारण केले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि घोडेगाव पोलीसांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मात्र बस आगीत जळुन खाक झाली आहे. बसला जेव्हा आग लागली तेव्हा बसमध्ये २९ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस ट्रॅव्हल आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे. ही धडक इतकी भीषण होती की बसने पेट घेतला होता. यामध्ये अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.
COMMENTS