मुंबई । नगर सह्याद्री - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढतच आहे. मनी लॉड्रींग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असेलल्या अनिल देशमुख यां...
मुंबई । नगर सह्याद्री -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढतच आहे. मनी लॉड्रींग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असेलल्या अनिल देशमुख यांच्या जामीनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे देशमुख यांच्या नागपूर कार्यालयातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी झाली आहे.
अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता अनिल देशमुख यांची दिवाळी यावेळीही तुरुंगातच जाणार आहे. 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांनी सीबीआय कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. याच प्रकरणात ईडी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला आहे. ईडीकडून जामीन मिळाल्यानंतर देशमुख यांनी सीबीआय कोर्टात जामिनासाठी अपील केले होते. त्याला सीबीआय न्यायालयाने झटका देत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे त्यांच्या नागपूर येथील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी वाढली आहे.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एसएच ग्वालानी यांनी गुरुवारी जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. राष्ट्रवादीच्या देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. देशमुख यांना गेल्या आठवड्यात ‘कोरोनरी अँजिओग्राफी’साठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
COMMENTS