मुंबई । नगर सह्याद्री - अजित पवार यांनी गंमतशीर वक्तव्य केले आहे. पावसाने देखील नेहमीच पवार साहेबांना साथ दिलेली आहे आणि मला देखील साथ दिली...
मुंबई । नगर सह्याद्री -
अजित पवार यांनी गंमतशीर वक्तव्य केले आहे. पावसाने देखील नेहमीच पवार साहेबांना साथ दिलेली आहे आणि मला देखील साथ दिली आहे असं गंमतीशीर वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या 50 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी अजित पवार बोलत होते.
यावेळी आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात सातत्याने वेगळे बदल होत आहे. अजून एक खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पावसालाही आता बरं वाटायला लागले आहे. नेहमीच पावसाने देखील पवार साहेबांना साथ दिलेली आहे आणि मला सुद्धा साथ दिलेली आहे. ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे.
अक्षरशः या भागामध्ये त्या काळी येताना वाटमाऱ्या व्हायच्या. इथे कोणीही येत नव्हते. वंजारवाडी, रुई सावळचा हा भाग रात्री कोणी यायला देखील घाबरायचे. अक्षरशः भीती वाटायची लोकांना. ज्यावेळी विद्या प्रतिष्ठान सुरू झाले तेव्हा या ठिकाणी कशाला सुरू केली संस्था? असा प्रश्न अनेकांना पडला होता असे अजित पवार म्हणाले आहे. त्यांच्या भाषणाने यावेळी जोरदार टाळ्या घेतल्या आहे.
COMMENTS