नाशिक | नगर सह्याद्री नाशिकमध्ये आज (शनिवार) सकाळी एक दुर्देवी घटना घडली. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस ट्रॅव्हल आणि आयशर ट्रकची समो...
नाशिक | नगर सह्याद्री
नाशिकमध्ये आज (शनिवार) सकाळी एक दुर्देवी घटना घडली. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस ट्रॅव्हल आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की बसने पेट घेतला. यामध्ये १३ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
या दुर्घटनेत मृत झालेल्या प्रवाशांची ओळख पटत नसल्याने संबंधित मृतांच्या ओळखीसाठी डीएनए टेस्ट करण्यात येणार असून त्याचबरोबर इतर फॉरेंसिन्क टेस्ट काण्यात येणार असल्याची महिती नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिली आहे. त्याचबरोबर मृतांची ओळख पटविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मदत कक्ष तयार करण्यात आले असून दोन टोल फ्री नंबरही देण्यात आले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्यांचीदेखील मुख्यमंत्री भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मदतीची घोषणा केली आहे.
COMMENTS