नवी दिल्ली । नगर सह्याद्री केदारनाथमधील बाबा भोलेनाथांचे सुमारे तीन तासांनी दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्रीनाथला पोहोचले. पं...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री
केदारनाथमधील बाबा भोलेनाथांचे सुमारे तीन तासांनी दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्रीनाथला पोहोचले. पंतप्रधान मोदी आज रात्री भगवान विष्णूंचे निवासस्थान असलेल्या बद्रीनाथ येथे मुक्काम करणार आहेत. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा ६ वा केदारनाथ दौरा आहे. बाबांच्या दर्शनासाठी त्यांनी हिमाचली टोपी व खास पोशाख चोला-डोरा घातला होता. चंबाच्या महिलांनी हा पोशाख मोदींना भेट दिला. केदारनाथ दौर्यात ते ३४०० कोटींहून अधिक रूपयांच्या विकास योजनांची पायाभरणी करतील. या संबंधीच्या वृत्तानुसार पीएम मोदी केदारनाथ रोप-वे प्रकल्पाची पायाभरणी करतील. हा रोप-वे ९.७ किमी लांब असून, तो गौरीकुंडाला केदारनाथशी जोडेल. सध्या हे अंतर कापण्यासाठी जवळपास ६ तास लागतात. रोप-वे बनल्यानंतर हा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत होईल.
COMMENTS