शाहु मोडक करंडक एकांकिका स्पर्धेत न्यू आर्टसला १७ पारितोषिके अहमदनगर | नगर सह्याद्री नटश्रेष्ठ शाहु मोडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्प...
शाहु मोडक करंडक एकांकिका स्पर्धेत न्यू आर्टसला १७ पारितोषिके
अहमदनगर | नगर सह्याद्रीनटश्रेष्ठ शाहु मोडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत न्यू आर्टस महिविद्यालयाच्या नाना थोड थांबा’ या एकांकिकेने प्रथम क्रमांकाचा विजेता करंडक मिळवला, तर याच महाविद्यालयाच्या बोळवण’ने द्वितीय क्रमांकाचे पारितोषीक मिळवले. तर टॉक’ या एकांकिकेने प्रायोगिक स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
माऊली सभागृहात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय नटश्रेष्ठ शाहु मोडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत न्यू आर्टस महाविद्यालयाच्या कला विभागाने प्राचार्य डॉ.बी.एच. झावरे व विभाग प्रमुख प्रा.नवनाथ येठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत एकूण चार स्वतंत्र एकांकिका उरवल्या होत्या. त्यात नाना थोड थांबा’ सांघिक प्रथम, बोळवण’ सांघिक द्वितीयसह टॉक’ या एकांकिकेस प्रायोगिक प्रथम क्रमांकासह न्यू आर्टस महाविद्यालयाने एकूण १७ पारितोषीकांची लयलूट करत महाविद्यालयीन स्पर्धेत उच्चांक केला आहे.
एकांकिका नाना थोड थांबाना’ सांघिक प्रथम करंडक व पंचवीस हजार रूपये. दिग्ददर्शन प्रथम, पुरूष अभिनय प्रथम, स्त्री अभिनय प्रथम, विनोदी एकांकिका प्रथम, नेपथ्थ द्वितीय. एकांकिका बोळवण’ सांघिक द्वितीय, लेखन प्रथम- ऋषीकेश मोटे, दिग्दर्शन द्वितीय- योगिराज पोटे, प्रकाश योजना प्रथम- पवन पोटे, स्त्री अभिनय उत्तेजनार्थ, पुरूष अभिनय उत्तेजनार्थ. एकांकिका टॉक’ प्रायोगिक एकांकिका प्रथम, अभिनय उत्तेजनार्थ पवन पोटे. एकांकिका यशोदा’ स्त्री अभिनय तृतिय - अनुष्का पोटोळे, पुरूष अभिनय उत्तेजनार्थ- एकदंत कुलकर्णी.
वरील चारही एकांकिका या न्यू आर्टस महाविद्यालयाच्या असून, एकाच महाविद्यालयाच्या उच्चांकी, दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र जरे, सचिव जी.डी. खानदेशे, प्राचार्य डॉ.बी.एच. झावरे विभाग प्रमुख नवनाथ येठेकर यांच्यासह पदाधिकारी व प्राध्यापक यांनी महाविद्यालयातील सर्व नाट्य कलावंतांचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS