मुंबई । नगर सह्याद्री - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला धक्का बसेल असा मोठा निर्णय दिला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवस...
मुंबई । नगर सह्याद्री -
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला धक्का बसेल असा मोठा निर्णय दिला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेतील दोन्ही गटांकडे आता धनुष्यबाण चिन्ह वापरण्याचा अधिकार तात्पुरता काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसेनेतील ठाकरे गटाने आपल्या पक्षासाठी नवे चिन्ह ठरवले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षासाठी संभावित नावे आणि चिन्ह ठरवले असून त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला ३ पर्याय पाठवले आहे. मात्र, हे तिनही चिन्हे निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याने आता उद्धव ठाकरेंची ही मागणी पूर्ण होणार का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे १) त्रिशुळ २) उगवता सुर्य आणि ३) मशाल या तीन चिन्हांचे पर्याय ठाकरे गटाकडून आयोगाला देण्यात आले आहे. याशिवाय आपल्या गटाचे नावे हे १) शिवसेना बाळासाहेब ठाकरे २) शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि ३) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे मिळावे अशी मागणी आयोगाकडे ठाकरे गटाने केली आहे. चिन्हांच्या बाबतीत बोलायचे झाले तर निवडणूक आयोगाकडे एकूण १९७ चिन्हे उपलब्ध आहे. यातूनच दोन्ही गटांना आपापली चिन्हे निवडण्याचे आदेश आयोगाने दिले आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी आयोगाला पाठवलेली तिनही चिन्हे आयोगाच्या यादीत नसल्याने त्यांना ही चिन्हे मिळणार हा याबाबत शंका आहे.
उद्धव ठाकरेंनी ती तीन चिन्हे मागण्याही असू शकतात ही कारणं
-याबाबत उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, फ्री चिन्हांच्या यादीत त्रिशूळ समाविष्ट नसले तरी त्रिशूळ चिन्ह वापरण्याबाबत कायदेशीर अडचण नाही.
निवडणूक आयोगानंही त्रिशूळ वापरता येत नसल्याचे कोणतेही गाईडलाईन्स दिले नाहीत.
वाहन तसेच इतर चिन्ह शिवसेनेला लागू होत नाहीत.
त्रिशूळ चिन्ह देशात कोणत्याही राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाकडे नाही.
शिवसेनेची विचारधारा, आचार विचार आणि तत्वाला साधर्म्य असे चिन्ह त्रिशूळ आहे.
महत्वाचं म्हणजे ही तीनही चिन्ह हिंदू धर्माशी निगडीत आहे.
दरम्यान केंद्रीय निवडणुक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकासाठी दोन्ही गटांना उद्या, म्हणजे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी एक वाजेपर्यंत आपापलं चिन्ह निवडण्याचे आदेश दिले आहे. याबाबत आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पहावे लागेल.
COMMENTS