मुंबई । नगर सह्याद्री - शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण काल निवडणूक आयोगाने गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिका ...
मुंबई । नगर सह्याद्री -
शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण काल निवडणूक आयोगाने गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. मनसेच्या काही नेत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले होते. मात्र यावर आता कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहे.
शिवसेना, धनुष्यबाण आणि त्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया न देण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या चिन्हाबद्दल निर्णय दिल्यावर अनेकजण सोशल मीडियावर व्यक्त झाले आहे. शिंदे-ठाकरे यांच्यातील वाद सुरू असताना आपल्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर बोलू नये, अशी सूचना राज ठाकरेंनी दिली आहे.
COMMENTS