सरपंच प्रियंका लामखडे आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित

 गाव विकासासाठी महत्त्वाची भूमिका ; राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशनकडून दखल  अहमदनगर  | नगर सह्याद्री  नगर तालुयातील निंबळक गावच्या सरपंच स...

 गाव विकासासाठी महत्त्वाची भूमिका ; राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशनकडून दखल 

अहमदनगर  | नगर सह्याद्री 

नगर तालुयातील निंबळक गावच्या सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना बेळगाव येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणार्‍या आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यापूर्वी सरपंच प्रियंका लामखडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. शनिवार दि. ८ रोजी बेळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात सौ. लामखडे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातील नागरिकांना हा पुरस्कार देण्यात येतो.

पुरस्कार सोहळ्यासाठी कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, खासदार अमरसिंह पाटील, जिल्हा कमांडर अरविंद घट्टी, आमदार निलेश लंके यांच्यासह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील भारतीय सैन्यदलातील अधिकारी, सिने कलाकार उपस्थित होते.

निंबळक गावच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना. महिला सरपंच असून देखील सर्वांना सोबत घेत केलेला गावचा विकास. निंबळक ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील. सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये घेतलेले विविध ऐतिहासिक निर्णय, ठराव तालुयाला आदर्श असे ठरलेले आहेत. वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, पाणी प्रश्न, विधवांना सन्मान, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, कोरोना काळात केलेले कार्य या सर्वांची दखल घेऊन त्यांना आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन, बेळगाव यांच्या वतीने देण्यात येणारा आंतरराज्य गौरव पुरस्कार मिळविणार्‍या सौ. प्रियंका लामखडे या तालुयातील पहिल्याच सरपंच ठरलेल्या आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रियंका लामखडे यांचे कार्य आदर्शवत

निंबळक गावच्या सरपंच पदाची धुरा सौ. प्रियंका अजय लामखडे या यशस्वीपणे सांभाळत आहे. त्यांच्या कल्पक नेतृत्वातून गावचा कायापालट होत आहे. त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले निर्णय हे ऐतिहासिक ठरलेले आहेत. इतर गावांनी निश्चितच आदर्श घ्यावा असे निर्णय निंबळक गावामध्ये घेण्यात आलेले आहेत.

-नीलेश लंके, आमदार.


सन्मान निंबळक गावाचा

मला मिळालेला सन्मान हा माझा वैयक्तिक नसून संपूर्ण निंबळक गावाचा आहे. गाव विकासाचा निर्णय घेताना सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, ग्रामस्थ यांचे बहुमोल सहकार्य मिळत आहे. त्यामुळेच गाव विकासाबाबत निर्णय घेताना अडचण येत नाही.

-प्रियंका अजय लामखडे, सरपंच, निंबळक 

COMMENTS

Name

Accident,38,Ahmednagar,7270,Akole,20,braking,44,Breaking,5131,Business,5,corona,564,Crime,1452,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1344,Epaper,29,Health,399,indan,8,India,1226,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4906,manoranjan,14,Mumbai,228,Nagar,291,Newasa,65,Parner,3031,Parner Ahmednagar,57,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1283,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,155,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,135,Shrirampur,9,Sport,272,sports,43,weather,32,World,130,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: सरपंच प्रियंका लामखडे आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित
सरपंच प्रियंका लामखडे आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjERONV0yEJ2j1cXUU4y_wr_Uy9ml4lwW3zhLp6vYi3l-AJ4eaUJDmLtk-umSDuVQ5-hpTx9_qaMNBOO01ksB7tRq2fbpMN1li_tueSVrCwe08UH4yUdsJ3A5X7eWaBucU4aVUmuMZaAWyOITC7AqgFxmqaAFyhr2QN6qq4A5mQr36bdzj4N_TY8SL3/s16000/LAMKHADE.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjERONV0yEJ2j1cXUU4y_wr_Uy9ml4lwW3zhLp6vYi3l-AJ4eaUJDmLtk-umSDuVQ5-hpTx9_qaMNBOO01ksB7tRq2fbpMN1li_tueSVrCwe08UH4yUdsJ3A5X7eWaBucU4aVUmuMZaAWyOITC7AqgFxmqaAFyhr2QN6qq4A5mQr36bdzj4N_TY8SL3/s72-c/LAMKHADE.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2022/10/nagar-sahyadri-priynka-lamkhede-aantararjya-gavrav-puraskarane-sanmanit.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2022/10/nagar-sahyadri-priynka-lamkhede-aantararjya-gavrav-puraskarane-sanmanit.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content