लंडन येथील गौरवाबद्दल मानधना परिवारातर्फे डॉ. दीपक यांचा सत्कार अहमदनगर | नगर सह्याद्री उत्कृष्ट आणि अविरत ४० वर्षांपेक्षा जास्त वैद्यकीय स...
लंडन येथील गौरवाबद्दल मानधना परिवारातर्फे डॉ. दीपक यांचा सत्कार
अहमदनगर | नगर सह्याद्रीउत्कृष्ट आणि अविरत ४० वर्षांपेक्षा जास्त वैद्यकीय सेवा देणारे ड़ॉ. दीपक एस. एस. यांच्या सेवेमुळे अहमदनगर चे नाव परदेशात पोहोचले. मी त्यांना त्यांच्या कार्यासाठी व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देतो, असे गौरवोदगार नगरचे प्रसिद्ध व्यापारी मोहनलाल मानधना यांनी व्यक्त केले.
सर्टिफिकेट ऑफ एसलैंस आणि कोविड काळात उत्तम कामगिरी केल्या मुळे लंडन येथील ब्रिटिश पार्लमेंट हाउस ऑफ कॉमन्स येथे नगरचे प्रथितयश वैद्यकीय चिकित्सक ड़ॉ दीपक एस.एस. यांचा सन्मान करण्यात आला. या निमित्त मोहनलाल मानधना यांनी आपल्या निवासस्थानी ड़ॉ दीपक यांचा व त्यांच्या पत्नी ज्योति दीपक यांचा सत्कार मधुमालती मानधना यांनी केला. या प्रसंगी बोलताना मानधना यांनी ड़ॉ. दीपक यांच्या कडून नगर मधील अनेक नागरिक पिढ्या न पिढ्या वैद्यकीय तपासणी व उपचार घेतात. जशी देवावर आपली श्रद्धा आणि निष्ठा आहे. तसेच या वैद्यकीय महामेरू वर हजारो नागरिकांची श्रद्धा आहे. ती ४० वर्षानंतर ही कायम आहे. ज्या डॉटर चा गुण येतो तो तर रुग्णांसाठी देवच आहे. मला ही त्यांच्या पारिवारिक मित्र असल्याचा अभिमान आहे. त्यांनी अतिशय खड़तर प्रवास करून सुरुवातीला दीपक हॉस्पिटल आणि नंतर नगरची शान साईदीप हॉस्पिटल ची निर्मिती केली. त्यांना त्यांच्या सहकारी डॉटर्सची महत्वाची साथ लाभली. या मुळे नगरच्या लोकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा, आधुनिक प्रणालीचा वापर करून एकाच छताखाली मिळत आहे. ते साईदीप हॉस्पिटल च्या माध्यमातून आणि आता ड़ॉ. दीपक यांचे नाव लंडन मध्ये सुद्धा नोंदले गेले आहे. यामुळे ड़ॉ. दीपक यांचा सन्मान हा नगर जिल्हा वासियांचा सन्मान आहे असे मी मानतो असे मोहनलाल मानधना म्हणाले. यावेळी आयकर विभाग सहायक आयुक्त आनंद मुरायी, ड़ॉ आर.आर.धूत, ड़ॉ.रविन्द्र सोमाणी, डॉ. कैलाश झालानी, ड़ॉ. अनिलकुमार कुर्हाडे, ड़ॉ. किरण दीपक, ड़ॉ. वैशाली किरण, डॉ. अश्विन झालानी, ड़ॉ.गणेश सारड़ा, ड़ॉ. रोहित धूत, ड़ॉ. पायल धूत, ड़ॉ. कस्तूरी कुर्हाडे, साईदीप हेल्थ केयर ट्रस्टच्या नंदा सोमाणी, रोहिणी कुर्हाडे, अनिता झालानी, पराग मानधना आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS