आबासाहेब काकडे, एन. एन. सथ्था यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण अहमदनगर | नगर सह्याद्री आबासाहेब काकडे यांनी सर्वसामान्य लोकांच्या कल्याणा...
आबासाहेब काकडे, एन. एन. सथ्था यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
अहमदनगर | नगर सह्याद्री
आबासाहेब काकडे यांनी सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता आयुष्य खर्ची घातले असल्याचे प्रतिपादन प्रा. नामदेव जाधव यांनी केले. कर्मयोगी आबासाहेब काकडे यांचे ४४ वे पुण्यस्मरण सोहळा राष्ट्रीय शिक्षण मंडळ संचालित एन.एन.सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रा.नामदेव जाधव यांनी प्रतिपादन केले. आबासाहेब काकडे शिक्षण समूहाचे एन.एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये कॉ.आबासाहेब काकडे पुण्यस्मरण दिनानिम्मित्त कॉलेजच्या नव्या इमारतीमध्ये कॉ.ज.का.उर्फ आबासाहेब काकडे व कॉ.एन.एन. सथ्था तथा भाई सथ्था यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण डॉ.नामदेव जाधव यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, उच्च न्यायालयातील सिनिअर कौन्सिल अॅड. आर. एन. धोर्डे, डॉ. प्रतिभा जाधव, अशोक ठोंबरे तसेच इतिहासाचे प्राध्यापक संतोष यादव, आबासाहेब काकडे शिक्षण समूहाचे प्रमुख अॅड. डॉ.विद्याधर काकडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सर्जेराव निमसे होते.
प्रा. जाधव म्हणाले, आबासाहेब काकडे यांनी आपले आयुष्य लोकांच्या कल्याणाकरिता खर्ची घातले. आबासाहेबांना योग्य संधी मिळाली असती तर शेवगाव पाथर्डीचा कायापालट झाला असता. इतिहासात ज्यांचा इतिहास लिहिलेला आहे तेच भविष्यात इतिहास घडवतात निर्माण करतात. आबासाहेबांनी इतिहास घडवला, आपला समाज अज्ञानी असल्याने आपल्या समाजाचे मोठे नुकसान झाले आहे, हे आबासाहेबांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या तसेच अडाणी बहुजनांसाठी कायद्याच्याही संधी मिळवून दिल्या. आपल्याला राज्यात १२ लाख नवउद्योजक घडवण्याचे माझे स्वप्न आहे त्यासाठी मी महाराष्ट्रात फिरतो.शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांना सांगतो.
COMMENTS