ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या ४९ वा गळीत हंगामास प्रारंभ भेंडा | नगर सह्याद्री कारखान्याच्या २१४ गावाचे कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेल्या सर्...
ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या ४९ वा गळीत हंगामास प्रारंभ
भेंडा | नगर सह्याद्रीकारखान्याच्या २१४ गावाचे कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेल्या सर्व ऊसाचे गाळप केल्याशिवाय कारखान्याच्या हंगाम बंद केला जाणार नसल्याची ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली. नेवासा तालुयातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ४९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवार दि.११ ऑटोबर रोजी सकाळी १० वाजता कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते पहिली ऊस मोळी टाकून करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, जेष्ठ संचालक अॅड.देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, विठ्ठलराव लंघे, काशीनाथ नवले, अशोक मिसाळ, काकासाहेब शिंदे, प्रा.नारायण म्हस्के, जनार्धन कदम, शिवाजी कोलते, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, सखाराम लव्हाळे, दीपक नन्नवरे, लक्ष्मण पावसे, विष्णू जगदाळे, बबन भुसारी, दादासाहेब गंडाळ, तुकाराम मिसाळ, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे उपस्थित होते.
प्रारंभी कारखान्याचे संचालक भाऊसाहेब कांगुणे व शारदा कांगुणे, मिल फोरमन राजेंद्र मनवेलीकर व कल्पना मनवेलीकर यांचे हस्ते गव्हाण तर ऊस पुरवठा विभागाचे कर्मचारी शहाराम म्हस्के व वैशाली म्हस्के यांचे हस्ते ऊस वजन काट्याचे विधिवत पूजा करण्यात आली.
घुले पुढे म्हणाले, डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प विस्तार व नवीन इन्सनरेशन बॉयलर ही कामे हाती घ्यायची आहेत. ही सर्व कामे पूर्ण करून पुढील वर्षीच्या ५० व्या गळीत हंगामाला सामोरे जायचे आहे.सकारात्मक भूमिका घेऊन सर्वांच्या सहकार्याने यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करू.
यावेळी नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजी शिंदे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोलते, अजित मुरकुटे, भैय्यासाहेब देशमुख, दिलीप लांडे, गणेशराव गव्हाणे, बापूसाहेब नजन, अशोक वायकर, घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबन धस, अंबादास कळमकर, दिलीप मोटे, बाळासाहेब नवले, दिगंबर शिंदे, सोपान महापुरे, शंकर भारस्कर, गोरक्षनाथ कापसे, भाऊसाहेब चौधरी, रामभाऊ पाउलबुद्धे, भानुदास कावरे, बलभीम फुलारी, तुकाराम काळे, डॉ.रामकीसन सासवडे, शिवाजी भुसारी, उत्तम आहेर, शिवाजी भुसारी, पुरुषोत्तम सर्जे, माधव काळे, राजेंद्र परसय्या, रामदास गोल्हार, कल्याण नेमाणे, डॉ.सुधाकर लांडे, देविदास पाटेकर, विनायक आहेर, राजाजी बुधावंत, रामनाथ राजपुरे, भीमराज शेंडे, शिवाजी चिंधे, खंडू खंडागळे, रावसाहेब निकम, अरुण देशमुख, संभाजी आगळे, कारखान्याचे कामगार संचालक सुखदेव फुलारी, संभाजी माळवदे, तांत्रिक सल्लागार एस.डी.चौधरी, एम. एस. मुरकुटे, चिफ इंजिनिअर राहुल पाटील, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, रामनाथ गरड, विलास लोखंडे आदी उपस्थित होते..बाळासाहेब आरगडे यांनी सूत्रसंचालन केले. तुकाराम मिसाळ यांनी आभार मानले.
COMMENTS