प्रांताधिकार्यांना दिले निवेदन अहमदनगर | नगर सह्याद्री नगर तालुक्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. बर्याचशा भागांमध्ये अतिवृष्टी झ...
प्रांताधिकार्यांना दिले निवेदन
अहमदनगर | नगर सह्याद्रीनगर तालुक्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. बर्याचशा भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. हाता तोंडाशी आलेली पिके पाण्यात सडत आहेत. यामुळे अतिवृष्टीबाधीत पिकांचे तत्काळ पंचनामे करावे अशी मागणी नगर तालुका महाविकासआघाडीने प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे नगर तालुक्यात सोयाबीन, मका, तूर, कापूस, उडीद, बाजरी, कांदा आदींसह इतरही आणखी पिके पाण्यात अक्षरश: सडत आहेत. तसेच फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. बर्याचशा घरांची पडझड झालेली आहे, यामुळे अनेक संसार उघड्यावर आलेले आहेत.
नगर तालुयातील चिचोंडी पाटील, वाळकी, जेऊर, निंबाळक, चास, देहरे, नालेगाव, कापूरवाडी या महसूल मंडलामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्या त्या ठिकाणची पाहणी करून सरसकट पिकांचे पंचनामे करण्यात यावे. चिचोंडी पाटील परिसरामध्ये दि. १४ ऑटोबर रोजी ८५ मिलिमीटर तसेच दि. १६ रोजी ७७ मिलिमीटर इतया मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. अशाच प्रकारे सरासरी नगर तालुयामध्ये सर्वत्र पावसाचे प्रमाण आहे व शासन दरबारी ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस एका दिवसात झाला तर त्यास अतिवृष्टी असे संबोधले जाते. त्यामुळे वरील बाबींची दखल घेऊन सरसकट पिकांचे पंचनामे तातडीने करावेत व बाधित शेतकर्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, जेणेकरून त्यांची दिवाळी गोड होईल अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, माजी सभापती प्रविण कोकाटे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत आदी उपस्थीत होते.
COMMENTS