आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?

मुंबई / नगर सह्याद्री  महाराष्ट्रातील ठाकरे कुटुंबातील आणखी एक ठाकरे  राजकारणाच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे य...



मुंबई / नगर सह्याद्री 

महाराष्ट्रातील ठाकरे कुटुंबातील आणखी एक ठाकरे  राजकारणाच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी भविष्यात निवडणूक लढवू शकतात असे संकेत दिले आहेत. गरज पडली तर मी सुद्धा निवडणूक लढवेन, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. याआधी आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता अमित ठाकरे हेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता लागली आहे. 


राज्यातील सत्तास्थापनेनंतर मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे चांगलेच सक्रिय झाले असून सध्या ते राज्यव्यापी दौरा करत आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत. ठाकरे कुटुंबीयांमध्ये सगळ्यात आधी आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीला सामोरं गेले होते. 2019 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. ही निवडणूक जिंकली देखील. त्यानंतर आता आणखी एक ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार का? यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत.


अमित ठाकरे काय म्हणाले

अमित ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या आणखी काही वक्तव्यांनी राजकीय निरीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वडील राजकारणात आहेत म्हणून मी राजकारणात आलो, अन्यथा मी राजकारणात उतरलो नसतो, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. आताची राजकीय परिस्थिती बघून राजकारणात येण्याची इच्छाच झाली नसती. सध्याची राजकारणातली परिस्थिती भयावह असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. याशिवाय शिवसेनेतले दोन गट आणि भाजपच्या राजकारणात मनसेला संधी असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपण निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आणि ती खरी करुन दाखवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी भूमिकाही जाहीर केली होती. पण त्यांनी निवडणूक मात्र लढवली नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले आणि निवडणूक लढवणारे ते पहिले ठाकरे ठरले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आलं आणि ते विधानपरिषदेवर निवडून गेले. आता अमित ठाकरे यांनीही निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. 

COMMENTS

Name

Accident,35,Ahmednagar,7238,Akole,20,braking,43,Breaking,5116,Business,4,corona,560,Crime,1433,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1331,Epaper,29,Health,395,indan,8,India,1213,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4844,manoranjan,13,Mumbai,213,Nagar,291,Newasa,65,Parner,3018,Parner Ahmednagar,54,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1264,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,153,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,131,Shrirampur,9,Sport,271,sports,40,weather,32,World,125,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?
आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh4e-uXGAimWCdfjQZubBgqVA_JQOOSUUxn997Z2TNcAbC0NaB2r48FHpir0-m4OW8Ea9o5x4d8iVGqOTfQ79Y5KPQlJU7zEDmGP36t9kiGlZcqwug3-iaAzjsMN3VTOhNgtd5_ut2L1gsHrZBd7sH7zQUMeaOuaAH5FUA5ekhpNRkcWcL3y-HuWaRz/w640-h358/thakre.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh4e-uXGAimWCdfjQZubBgqVA_JQOOSUUxn997Z2TNcAbC0NaB2r48FHpir0-m4OW8Ea9o5x4d8iVGqOTfQ79Y5KPQlJU7zEDmGP36t9kiGlZcqwug3-iaAzjsMN3VTOhNgtd5_ut2L1gsHrZBd7sH7zQUMeaOuaAH5FUA5ekhpNRkcWcL3y-HuWaRz/s72-w640-c-h358/thakre.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2022/10/maharashtra-mumbai-sena-manse-politics-.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2022/10/maharashtra-mumbai-sena-manse-politics-.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content