मुंबई / नगर सह्याद्री मनोरंजन सृष्टीतून पुन्हा एकदा दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आह...
मुंबई / नगर सह्याद्री
मनोरंजन सृष्टीतून पुन्हा एकदा दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे...
प्रसिद्ध तामिळ अभिनेता-दिग्दर्शक लोकेश राजेंद्रनने आत्महत्या केली आहे. अवघ्या 34 व्या वर्षी या टीव्ही अभिनेत्याने टोकाचे पाऊल उचलले. लोकेशने एक बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. एक उत्तम अभिनेता-दिग्दर्शक म्हणून तो परिचित होतां.
दरम्यान, लोकेश आणि त्याच्या पत्नीत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. अभिनेत्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळजवळ एका महिन्यापूर्वी त्यांना समजले होते की, लोकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये काहीतरी वाद सुरु आहे. चार दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोटाची कायदेशीर नोटीस पाठवली होती. तो या सर्व गोष्टींमुळे प्रचंड तणावात होता. आपण लोकेशला शुक्रवारी शेवटचे पाहिले असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैवाहिक आयुष्यात सुरु असलेल्या चढ-उतारांमुळे लोकेश प्रचंड तणावात होता. यातूनच त्याला मद्यपान करण्याची सवय जडली होती. तो दररोज मद्य प्राशन करु लागला होता.
COMMENTS