मुंबई / नगर सह्याद्री - राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी नाव जाहीर केली आहेत. उद्धव ठ...
मुंबई / नगर सह्याद्री -
राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी नाव जाहीर केली आहेत. उद्धव ठाकरे गटासाठी 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाव देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व शिंदे गटाने निवडणूक चिन्ह म्हणून मागणी केलेले त्रिशूळ व गदा ही दोन्ही चिन्हे बाद ठरवली आहेत. यासाठी आयोगाने ही चिन्हे धार्मिक प्रतीके असल्याचा दाखला दिला आहे. तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर शिंदे गटाला बाळासाहेब शिवसेना हे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळाले आहे. तर ठाकरे गटाला धगधगती मशाल हे नवे पक्षचिन्हही दिले आहे.
निवडणूक आयोगाने 'धनुष्यबाण' गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यात त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संभाव्य निवडणूक चिन्हांची व पक्षाच्या नावाचीही माहिती दिली होती.
ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हे दिली होती. यात एक त्रिशुळ, दुसरा उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगती मशाल नावेही निवडणुूक आयोगाला दिली होती. परंतु त्यातील त्रिशूळ हे चिन्ह आयोगाने रद्दबातल ठरवले. तर शिंदे गटाचेही गदा हे चिन्ह रद्दबातल ठरवले आहे. दोन्ही चिन्हे धार्मिक असल्याचेही निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
ठाकरे गटाला धगधगती मशाल
ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हे तीन चिन्ह पर्याय म्हणून दिले होते. त्यानंतर आयोगाने त्यांना धगधगती मशाल हे नाव दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षचिन्हासाठी नवीन तीन पर्याय देण्याचे सांगितले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून आता कोणते नवीन तीन पर्याय दिले जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आमची धगधगती मशाल- पेडणेकर
शिवसेनेच्या मुंबईतील माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली की, मशाल हे चिन्ह उषःकालाचे प्रतीक आहे. ती आम्ही मशाली पुन्हा पेटवू ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. आमची धगधगती मशाल धगधगतच राहील.
COMMENTS