जिल्हा ऑटो रिक्षा टॅसी चालक-मालक संघटनेच्या वतीने आ. संग्राम जगताप यांचा सत्कार अहमदनगर | नगर सह्याद्री कुस्ती क्षेत्रामध्ये गोरगरिबांच्या...
जिल्हा ऑटो रिक्षा टॅसी चालक-मालक संघटनेच्या वतीने आ. संग्राम जगताप यांचा सत्कार
अहमदनगर | नगर सह्याद्रीकुस्ती क्षेत्रामध्ये गोरगरिबांच्या घरात देखील पैलवान तयार होणार असल्याचे मत अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी व्यक्त केले.
अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार संग्राम जगताप याची निवड झाली असता अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅसी चालक-मालक संघटनेच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करताना संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष दत्ताभाऊ वामन, सचिव अशोक औशीकर, शंकर गोरे, दिपक गहिले, शब्बीर शेख, राजेंद्र पाचारणे, जुबेर शेख, किशोर कुलट, मतीन शेख, वसंत मोकाटे, अजर खान, गोरख दळवी, मुन्ना परदेशी, निलेश कांबळे, सागर लांडे, रवी वाकचौरे, विठ्ठल शिंदे, किरण उंडे, सतीश मिसाळ, इलियास पैलवान, नितीन शेंडे, सुनील ठाकरे, बाळासाहेब बेल्हेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देत आमदार संग्राम जगताप म्हणाले की जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी माझ्यावर अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाची जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन यशस्वीपणे पारपाडू व अनुभवांचा वारसा अंगीकारून जिल्ह्यातील कुस्तीमध्ये येणारी नवीन पिढी मोठ्या प्रमाणावर घडविणार असून. कुस्ती क्षेत्राला आलेली मरगळ पुसून लवकरात लवकर तालुकास्तरावर कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. व शहरी व ग्रामीण भागातील मल्लांना राज्य,राष्ट्रीय पातळीवर घेवून जाण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले जाणार असुन या क्षेत्रामध्ये तरुणांना जोडणे गरजेचे असून कुस्ती क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत आता मुली सुद्धा कुस्ती स्पर्धाकडे वळू लागल्या असुन नगर जिल्ह्याचा देशामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये असलेला दबदबा पुन्हा एकदा दाखवायचा आहे. उच्च दर्जेदार मल्ल घडवायचे प्रयत्न करणार असून अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ कुस्ती क्षेत्राला नक्कीच नावलौकिक मिळवून देऊ असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी यावेळी केले. तसेच संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले म्हणाले हीींिीं://ुुु.लश्रेससशी.लेा/लश्रेस/िेीीं/शवळीं/३८५४५६८४४४२१५९१३२१५/१६४५३९३२१६२००१७४४७१ की कुस्ती क्षेत्रामध्ये गोरगरिबांच्या घरात देखील पैलवान तयार होणार असुन जिल्ह्यातून उत्कृष्ट पैलवान निर्माण व्हावे यासाठी प्रशिक्षकाची नेमणूक केली जाणार असून.आ.संग्राम जगताप यांच्यामुळे कुस्ती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
COMMENTS