निघोज / नगर सह्याद्री - निघोज आणी परिसरात शुक्रवार दि.२१ रोजी पहाटे दोन ते सकाळी सहाच्या दरम्यान ढगफुटी सदृश पाउस झाल्याने परिसरातील नदी ना...
निघोज / नगर सह्याद्री -
निघोज आणी परिसरात शुक्रवार दि.२१ रोजी पहाटे दोन ते सकाळी सहाच्या दरम्यान ढगफुटी सदृश पाउस झाल्याने परिसरातील नदी नाले ओढे यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. तसेच कुकडी डावा कालव्यातील धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने कुकडी नदीला पाटबंधारे विभागाने साडे सोळा हजार क्युसेक्सने विसर्ग केला असून जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील मंळगंगा देवीच्या मंदीराजवळ पाणी आले असून नदिकाठच्या लोकांनी सावध राहण्याचे आवाहन तालुका प्रशासन व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
या परिसरात गेली दोन दिवस पाउसाने उघडीप दिली होती. मात्र शुक्रवारी पहाटे दोन ते सकाळी सहाच्या दरम्यान ढगफुटी सदृश पाउस झाल्याने ओढे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. गेली अनेक वर्षात ऑक्टोबर महिन्यात असा पूर पाहिलाच नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ मंडळी व्यक्त करीत आहेत. तसेच कुकडी डावा कालव्याच्या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने कुकडी नदीला साडे सोळा हजार क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला असल्याने जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील निघोज - टाकळी हाजी या गावांना जोडणारा मोठा पुल तसेच मंळगंगा मंदिराजवळ पाणी आले असून कुकडी नदीने रोद्र रुप धारण केले आहे. तसेच धरण परिसरात आणखीन पाउस झाल्यास या पेक्षा जास्त पाणी सुटण्याची शक्यता गृहीत धरून कुकडी नदीच्या काठची लोकवस्ती, वाड्या व गावे यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुका प्रशासन व पाटबंधारे विभागाने लोकांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पारनेर तालुक्यात बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाउस झाला असून शिरूर - निघोज तसेच पारनेर - निघोज रस्त्यावरील वाहतूक सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत ठप्प झाली होती. देवीभोयरे, वडझिरे, जवळा या पुलावरुन पाणी वाहत असल्याने पाच ते सहा तास वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. या ढगफुटी सदृश पाऊसाने शेतकऱ्यांची सर्वाधिक हानी झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी बियाणे घेउन रोपे तयार केली होती ती नामषेश झाली असून सोयाबीन व ईतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरकारने सरसकट मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची मागणी जनतेतून होत आहे.
COMMENTS