पारनेर । नगर सह्याद्री - प्रति जेजुरी म्हणून नावलौकिक असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील कोरठण देवस्थानच्या अध्यक्षपदी शालिनी अ...
प्रति जेजुरी म्हणून नावलौकिक असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील कोरठण देवस्थानच्या अध्यक्षपदी शालिनी अशोक घुले तर उपाध्यक्षपदी महेश भास्कर शिरोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. कोरठण खंडोबा देवस्थानच्या सभागृहात रविवारी कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली असून यावेळी मार्गदर्शक म्हणून देवस्थानचे माजी अध्यक्ष पांडुरंग गायकवाड व विश्वस्त राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे. तर या देवस्थानच्या सरचिटणीस पदी जालिंदर महादु खोसे, कोषाध्यक्षपदी तुकाराम बाळाजी जगताप, चिटणीस म्हणून कमलेश अर्जुन घुले, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुरेश पांडुरंग फापाळे, अन्नदान कमिटी सुवर्णाताई धाडगे यांची निवड करण्यात आली आहे.
पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या १५ विश्वस्तांची यादी नगरच्या धर्मदाय आयुक्त कडून २३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. नगरचे धर्मदाय उपायुक्त बी व्ही दिवाकर यांच्याकडून विश्वस्तांची निवड जाहीर झाली असून या विश्वस्त निवडीमध्ये अनेक जुन्या नव्यांना विश्वस्त पदासाठी संधी मिळाली. तर या विश्वस्त निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचे वर्चस्व दिसून येत होते. या निवडीवेळी सरपंच राहुल झावरे, अशोक घुले, साहेबराव चिकणे, बाळासाहेब पुंडे, सौरभ बेलकर, दिलीप जगताप, अमोल घुले, दादाभाऊ चिकणे, सुरेश सुंबरे, पोपट सुपेकर, चंद्रकांत कुलकर्णी, शामा हवालदार, कारभारी घुले, गंगाराम कोळेकर, मार्तंड जगताप, बबन भांबरे, अक्षय जगताप, पुजारी शिवाजी क्षीरसागर, रमजान चौगुले, सोमनाथ क्षिरसागर व संघर्ष गणेश तरुण मित्र मंडळ व अशोक घुले मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या कोरठण खंडोबा देवस्थान विश्वस्तांची नावे धोंडीभाऊ गोविंद जगताप, रामदास देवराम मुळे, जालिंदर महादु खोसे, महादेव पांडुरंग पुंडे, पांडुरंग विठ्ठल गायकवाड, शालिनी अशोक घुले, कमलेश अर्जुन घुले, तुकाराम बाळाजी जगताप, दिलीप रामचंद्र घुले, चंद्रकांत शंकर ठुबे, राजेंद्र भिकाजी चौधरी, सुवर्णा अतुल घाडगे, महेश भास्कर शिरोळे, सुरेश पांडुरंग फापाळे, अजित हरिभाऊ महांडुळे उपस्थित होते. यावेळी देवस्थानचे मावळते अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी चंपाषष्ठी असो वा वार्षिक यात्रा महोत्सव यासाठी नियोजन महत्त्वाचे असून सर्वांनी एक दिलाने व एक मनाने भविष्यात हातात हात घालून काम केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जरी माझ्याकडे पद नसले तरी मी पूर्ण वेळ या देवस्थानची व खंडोबाची सेवा करणार असल्याचे पांडुरंग गायकवाड यांनी आवर्जून सांगितले आहे. यावेळी माजी सरपंच अशोक घुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी जी शिकवण आहे त्या शिकवणीला तडा जाऊ न देता सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे आवर्जून सांगितले आहे.
प्रति जेजुरी म्हणून नाव लौकिक असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या पदाधिकारी निवडीत आमदार निलेश लंके यांच्याकडे बहुमत असतानाही त्यांनी ॲडव्होकेट पांडुरंग गायकवाड गटाचे जालिंदर खोसे यांना सचिव पदाची संधी दिली. आमदार निलेश लंके यांच्याकडे नवीन सदस्यांचे बहुमत असतानाही त्यांनी पदाधिकारी निवडीत इतर सदस्यांना संधी दिल्याने त्यांचा मनाचा मोठा मोठेपणा दिसून आला आहे.
श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचे अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून मला संधी मिळाली असून या संधीचे मी सोने करणार आहे. देवस्थान परिसरातील विकास कामे प्रलंबित आहे. ती प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे सर्वांना बरोबर घेऊन कारभार करणार असल्याची ग्वाही देवस्थानच्या नूतन अध्यक्षा शालिनी अशोक घुले यांनी दिली आहे.
COMMENTS