अहमदनगर | नगर सह्याद्री दोन लाख ४० हजार रूपयांची रक्कम व दुचाकी चोरीला गेल्याची खोटी फिर्याद दिल्याने कोतवाली पोलिसांनी फिर्यादी होत दोघांव...
अहमदनगर | नगर सह्याद्री
दोन लाख ४० हजार रूपयांची रक्कम व दुचाकी चोरीला गेल्याची खोटी फिर्याद दिल्याने कोतवाली पोलिसांनी फिर्यादी होत दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशोक पंढरीनाथ परभणे (वय ४२, रा. बाबुर्डी घुमट, ता. नगर) व त्याचा कामगार जोगेंदर खदारू चव्हाण (वय २६, हल्ली रा. बाबुर्डी घुमट, मूळ रा. उत्तरप्रदेश) अशी दोघांची नावे आहेत.
पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता परभणे व चव्हाण कोतवाली पोलीस ठाण्यात आले. परभणे याने दुचाकी चोरीची फिर्याद दिली होती. पोलिसांनी चितळे रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेजवळ जाऊन माहिती घेतली असता त्यांना अशी घटना घडल्याबाबत साक्षीदार मिळाले नाहीत. तसेच फिर्यादी व कामगार चव्हाण यांच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने हा गुन्हा दाखल केला.
COMMENTS