पारनेर | नगर सह्याद्री तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या काठावेळा व डोंगरवाडी गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही जिल...
तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या काठावेळा व डोंगरवाडी गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही जिल्हा परिषद सदस्या राणी नीलेश लंके यांनी दिली आहे. आ. लंके व जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांच्या विशेष प्रयत्नातून सन २०२१-२०२२ जन सुविधेअंतर्गत ३३ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ राणी लंके यांच्या हस्ते पार पडला.
निधीअंतर्गत खटाटेवस्ती रस्ता काँक्रीटीकरण, गावठाण ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रस्ता काँक्रीटीकरण, स्मशानभूमी परिसर विकास करणे त्याचबरोबर काटाळवेढा व डोंगरवाडी स्मशानभूमी लाईट व्यवस्था करणे ही विकासकामे समाविष्ट आहेत. बरेच दिवसांपासून प्रलंबित असलेला खटाटेवस्ती रस्ता मार्गी लागल्यामुळे वस्तीवरील नागरिकांनी आ. लंके, जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांचे आभार मानले.
येणार्या काळात काटाळवेढा व डोंगरवाडी गावासाठी विकासनिधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राणी लंके यांनी दिली. यावेळी सरपंच पियुष गाजरे, उपसरपंच गणेश पवार, माजी उपसरपंच अजित भाईक, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब गुंड, माजी चेअरमन शिवाजी डोंगरे, माजी चेअरमन बाबाजी डोंगरे, रामदास गुंड, सुभाष गाजरे, बारकु भाईक, यशवंत भाईक, अर्जुन गाजरे, विनोद श्रावदे, लक्ष्मण भाईक, विलास भाईक, दत्तू गाजरे, संभाजी भाईक, भाऊसाहेब गाजरे, शरद पवार, अमोल कांबळे, दत्ता भाईक, संजय सरोदे, माऊली गुंड, नारायण वाघ, बाबाजी गाजरे, अनिल भाईक, राजू गाजरे, संतोष भाईक, माऊली भाईक, चंदन पवार, सोमनाथ भाईक, संपत भाईक, बाळासाहेब भाईक, मुकेश सरोदे, बाळासाहेब सरोदे, गणेश वाघ, महादू भाईक, बाबाजी भाईक, दत्तू पाटील भाईक, यशवंत वाघ, पांडुरंग गुंड, गोविंद गुंड, संजय कडूस्कर, शिवाजी गफले आदी उपस्थित होते.
COMMENTS