अहमदनगर | नगर सह्याद्री पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हेच खरे शिक्षण महर्षी असून समता धिष्टीत समाज निर्मितीसाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर...
पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हेच खरे शिक्षण महर्षी असून समता धिष्टीत समाज निर्मितीसाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. सीताराम काकडे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त सप्ताह साजरा करण्यात आला. हिंगणगाव (ता. नगर) येथील विद्यालयात शिक्षण महर्षी कर्मवीर या विषयावर प्रसिद्ध साहित्यिक वक्ते प्रा. सीताराम काकडे पाटील यांचे व्याख्यान झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जि. प. सदस्य माधवराव लामखडे, प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट व नोबल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. पोपटराव कर्डिले, डॉ. दिलीप पवार, उदयोजक रमेश शिंदे, सरपंच आबा पाटील सोनावणे, उदयोजक रामदास ससे, हमीदपूरचे उपसरपंच छबुराव कांडेकर आदी उपस्थित होते.
काकडे म्हणाले, तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातीय विषमतेने भाऊरावांचे मन व्यथित होत असे. माणूस ही एकच जात व मानवता हाच धर्म, आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत तर हा भयावह सामाजिक भेदभाव का? म्हणूच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या सानिध्यात तयार झालेल्या भाऊरावांनी स्वतःला शिक्षण व सामाजिक कार्यात झोकून दिले. सर्व धर्मातील मुलांसाठी एकत्र वसतिगृह काढले. त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण शिक्षणाचा वटवृक्ष उभा केला.
COMMENTS