निघोज | नगर सह्याद्री दिवाळीचा आनंद शहरी भागात सुरू झाला असला तरी ग्रामीण भागात विशेष करुन पारनेर तालुयातील कुकडी डावा लाभक्षेत्रातील गावां...
दिवाळीचा आनंद शहरी भागात सुरू झाला असला तरी ग्रामीण भागात विशेष करुन पारनेर तालुयातील कुकडी डावा लाभक्षेत्रातील गावांना मात्र दिवाळीचा म्हणावा तसा आनंद घेता येणार नाही, अशी परिस्थीती निसर्गाने निर्माण केली आहे. पावसाळा सुरू होउन पाच महिने झाले मात्र पाऊस अद्यापही पडत असल्याने शेतकर्यांच्या संकटात मोठी वाढ होत आहे.एकीकडे निसर्ग कोपला असून दुसरीकडे मायबाप असणार्या सरकारने शेतकर्यांना सावत्रपणाची वागणूक देत असल्याने शेती उत्पादनाला म्हणावा तसा भावच नाही. म्हणून दिवाळीचा सण साजरा करण्याची फक्त औपचारिकता होणार आहे.असेच दिवस शेतकर्यांसहीत सर्वसामान्य जनतेवर आले आहेत.
कुकडी पट्टा म्हटले की सधन बागायतदार शेतकर्यांचा एक समृद्ध परिसर म्हणून पुर्वी गणला जात होता. सध्याचा चार दोन वर्षाचा काळ पहाता हे दिवस फारच बेकार आले आहेत. सधन शेतकर्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला असून कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न शेतकर्यांसहीत सर्वसामान्य जनतेला पडलेला जटील प्रश्न आहे. कुकडी डावा कालव्याचा आशिर्वाद मिळालेले तालुयातील पंधरा ते सोळा गावे आहेत. मात्र सध्या शेतकर्यांसहीत सर्वसामान्य जनतेला एकीकडे ओला दुष्काळ आणि शेती मालाला भाव नसल्याने आर्थिक आणीबाणीत जगणे मुश्कील झाले आहे.
सणांची औपचारिकता साजरे करण्याचे दुर्देवी दिवस सगळ्यांवर आले आहेत. कांद्याला भाव नाही, बाजरी, सोयाबीन पिके पाण्यात पोहत आहेत. अति पावसामुळे उत्पादन कमी,तसेच पिकांची काढणी व करण्यासाठी पाउस उघडायला तयार नाही, निसर्ग कोपला आहेच.मात्र सरकार आमच मायबाप असणार्यांनी शेतकरी राजा हा आमचा सावत्र आहे.अशा पद्धतीने राज्य व केंद्र सरकार शेतकर्यांना सावत्र पणाची वागणूक देऊन या भागात आर्थिक आणीबाणी असल्यासारखी परिस्थीती निर्माण झाली आहे. या भागांतील शेतकर्यांचे प्रामुख्याने कांदा या नगदी पिंकावर आशा अपेक्षा असतात. चार साडेचार महिन्यात येणार्या कांदा पिकावर वर्षाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार असते.साधारण पाच एकर शेती असणारा शेतकरी दोन ते तीन एकर कांदा लागवड करुन मार्च ते एप्रिल महिन्यात काढणार्या कांद्याची कांदाचाळीत साठवणूक करीत असतात. यावर्षी साधारण सप्टेंबर अखेर पर्यंत कांद्याला दहा ते पंधरा रुपये किलोचा भाव मिळत गेला. चार दोन वर्षे बाजारपेठेत हीच परिस्थिती कांद्याची असल्याने व हेटरी कांदा उत्पादन घेण्यासाठी लागवड ते कांदा उत्पादन घेण्यासाठी साधारण हेटरी दिड ते दोन लाख रुपये खर्च येत असतो दहा ते पंधरा किलोच्या भावाचा विचार केला तर या मध्ये कांदा उत्पादनात शेतकरी पन्नास हजार ते एक लाख रुपये तोट्यात अशी परिस्थीती आहे.मुद्दल तर नाहीच नाही परंतु होणारा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी तोट्यात असल्याचे कर्जाचा डोंगर वाढलेलाच दिसत आहे अशी परिस्थीती कांदा उत्पादक शेतकर्यांची झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांसहीत सर्वसामान्य जनतेला याचा फार मोठा फटका बसला आहे. अशा बिकट परस्थीतीमुळे यावर्षी कांदा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शयता आहे.
गरिबांची दिवाळी उपक्रमासाठी मदत करण्याचे आवाहन
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन दरवर्षी दिवाळीत निघोज गावांतील गोरगरीब गरजू सर्वसामान्य जनतेसाठी दरवर्षी संदीप पाटील यांची गोरगरीबांची दिवाळी हा उपक्रम राबवीत आहे. हा सामाजिक उपक्रम राबवीण्याचे हे आठवे वर्ष आहे. मंगळवार दि. २५ रोजी सकाळी ९ वाजता कपिलेश्वर मंगल कार्यालयात हा सामाजिक उपक्रम संपन्न होत आहे. या उपक्रमात लोकसहभागातून सहभागी होणार्यांनी देणगी संपर्कासाठी गुगल पे व फोन पे नंबर संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन अकाउंट नंबर ५१०५१५८६११ खऋडउ उजऊए - उइखछ ०२८१७४७, नीलेश घोडे ९५९५७७६६६१, नीलेश खोबरे ९०९६५६५६५६, आप्पा वराळ ८१८०८०१६३२ या मोबाईल नंबरला संपर्क साधावा ही विनंती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकार्यांनी केले आहे.
COMMENTS