मुंबई । नगर सह्याद्री - मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटीनिवडणूकीवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच कालपर्यंत भाजपच्या बाजूने ओ...
मुंबई । नगर सह्याद्री -
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटीनिवडणूकीवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच कालपर्यंत भाजपच्या बाजूने ओढणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अचानक यु टर्न घेत अंधेरीची पोटनिवडणुक भाजपने लढवू नये, असे पत्र लिहीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे.या गोष्टीने राजकारणात अजून खळबळ उडाली आहे.
राज ठाकरेंच्या पत्रानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहे. यामध्ये भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी, आमचे ठरलय असे म्हणत अंधेरी पूर्वची पोट निवडणूक भाजप लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.
प्रवीण दरेकर यांच्या हस्ते आज पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा प्रारंभ करण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांनी लिहिल्या पत्रावर भाष्य केले आहे.
निवडणुका सहानभूतीवर लढवण्याचे दिवस संपले आहे. आता विकासाच्या मुद्द्यावर लोक निवडून देतात. शिसेनेतून 50 आमदार बाहेर पडले तरी उध्दव ठाकरे यांना सहानभूती मिळाली का? असा प्रश्न करत, उलट बाळासाहेबांच्या शिवसेना आमदारांचे राज्यात जंगी स्वागत होत आहे. लोक मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहे. असे म्हणत दरेकरांनी उध्दव ठाकरेंवर टिका केली आहे.
राज ठाकरेंच्या पत्राबाबत विचारले असता, लोकशाहीत पत्र लिहिण्याचा, मत मांडण्याचा व व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आमचा उमेदवार निवडून आणणं हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे. तेथील जनता निवडून देईल असा आम्हाला विश्वास आहे.
शिवाय पक्ष म्हणून जो विचार करायचा असतो तो आमचे नेतृत्व ठरवते आम्ही ठरवत नाही असे ही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. राज ठाकरेंच्या पत्रानंतर भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS