मुंबई । नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान दिले आहे. ''प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला कोर्टात जावे...
मुंबई । नगर सह्याद्री -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान दिले आहे. ''प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला कोर्टात जावे लागते. हिंमत असेल तर मैदानात या. माझी तयारी आहे. मी मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदानही तसे मिळणार नाही. तुम्ही आम्ही एका व्यासपीठावर आमने-सामने येऊ'' असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला आज लगावला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते.
ठाकरे म्हणाले, फारूक अब्दुल्ला मला म्हणाले होते की, अजिबात घाबरु नको, बाळासाहेबांसारखे लढ. भुजबळ एक वादळ आहे, त्यासोबतच वादळ निर्माण करणारे शरद पवारही आहे. वादळ, पाऊस असो न डगमगता उभे राहणारे शरद पवार आहे. मी लढाईच्या क्षणाची वाट बघतोय.
ठाकरे म्हणाले, भुजबळांनी शिवसेना सोडली तो आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता. जुन्या आठवणी खूप आहे. भुजबळांना मनापासून शुभेच्छा देतो. केवळ नेत्यांना आगे बढो म्हणू नका, घोषणा दिल्यानंतर आम्ही लढू पण मागे कुणीच नाही असे होता कामा नये.
स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू आहे. शिवसेनाप्रमुखांचा जुना साथी सोबती आजही राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमच्यासोबत आहे. ते गेले पण येताना राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेसही घेऊन आले आहे.
COMMENTS