प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम | पारंपारिक वेशभुषेत महिलांचा सहभाग अहमदनगर | नगर सह्याद्री सण-उत्सवात महिलांनी एकत्र येऊन आनंद घेत...
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम | पारंपारिक वेशभुषेत महिलांचा सहभाग
अहमदनगर | नगर सह्याद्रीसण-उत्सवात महिलांनी एकत्र येऊन आनंद घेतल्यास विचारांची देवाण-घेवाण होत असते. सखी एकमेकिंच्या सुख-दु:खात समरस होतात. महिला सर्व कुटुंबीयांना आनंद देत असताना, स्वत:साठी वेळ देऊन जीवनाचा आनंद घ्यावा. महिलांनी महिलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे दिपाली भोसले यांनी सांगितले.
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांनी कोजागिरी पौर्णिमेचा आनंद लुटून विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात महिला पारंपारिक वेशभुषा परिधान करुन सहभागी झाल्या होत्या.
स्टेशन रोड, येथे नव्याने झालेल्या राजयोग हॉटेल मध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून दिपाली राजेंद्र भोसले, मिनल मनोज पाटील, नमिता विक्रम फिरोदिया, पार्वती अरुणकाका जगताप, डॉ. वंदना फाटके, प्रिया आठरे, मोना कटारिया, भगवती चंदे, प्रविणा घैसास, जया गायकवाड, अनिता काळे, विद्या बडवे, सविता गांधी, स्वाती गुंदेचा, ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, शकुंतला जाधव, शोभा पोखरणा, ज्योती कानडे, जयश्री पुरोहित, शशिकला झरेकर, उषा गुगळे, प्रतिभा भिसे, दिपा मालू आदी उपस्थित होत्या. मिनल पाटील यांनी उपस्थित महिलांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. वंदना फाटके यांनी महिलांना आरोग्यविषयी मार्गदर्शन करुन विविध मोफत आरोग्य तपासणी शिबीराची माहिती दिली. तर कुटुंबाची काळजी घेताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. प्रविणा घैसास यांनी सादर केलेल्या माता जी च्या भजनाला उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
प्रास्ताविकात अलकताई मुंदडा यांनी महिलांसाठी वर्षभर राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत दिप्ती मुंदडा यांनी केले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी घेण्यात आलेल्या पारंपारिक वेशभुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक- अलका पोखरणा, दिपाली आंबेकर, द्वितीय- शोभा मुथियान, सोनाली थोरात, तृतीय- अरुना तुरु, मेघना मुनोत यांनी तर तंबोला स्पर्धेत मिनाक्षी जाधव, ज्योत्सना लिंमजे, सरस पितळे यांनी बक्षिसे पटकाविली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. प्रा. दिपक धायतडक यांनी बौध्दिक स्पर्धा तर दिपा मालू यांनी तंबोला स्पर्धा घेतल्या.
COMMENTS