पारनेर | नगर सह्याद्री तालुयातील धोत्रे गावातील भांड वस्तीवर मंगळवार दि. १९ ऑटोबरच्या मध्यरात्री दरोडा पडला असून यात दरोडेखोरांनी एक लाख ...
पारनेर | नगर सह्याद्री
तालुयातील धोत्रे गावातील भांड वस्तीवर मंगळवार दि. १९ ऑटोबरच्या मध्यरात्री दरोडा पडला असून यात दरोडेखोरांनी एक लाख ४० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तर दरोडेखोरांच्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलिस उपअधिक्षक अजित पाटील, पोलिस निरीक्षक घनशाम बळप, उपनिरीक्षक राजेश ठाकुर यांनी भेट दिली.
सावळेराम देवराम भांड (रा. जामगाव रोड, धोत्रे, ता. पारनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पाळत ठेवून २५ ते ३० वयाच्या आठ जणांनी दरोडा टाकला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरोडेखोरांच्या मारहाणीत देवराम विठ्ठल भांड, बेबी देवराम भांड, विठ्ठल बबन भांड, अलका बबन भांड हे जखमी झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्री दरोडेखोर फिर्यादी सावळेराम भांड यांच्या घरात घुसले. दरोडेखोरांनी लोखंडी रॉड, कोयते, चाकूचा धाक दाखवत दरोडेखोर घरात घुसले. त्यांनी भांड कुटुंबियांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील सोन्या चांदिचे दागिणे व रोख रक्कम घेऊन ते गेले.जाताना दुचाकीच्या काचा त्यांनी फोडल्या. तसेच दरोडेखोरांनी जाताना जवळ राहणारे विठ्ठल भांड यांनाही मारहाण करून त्यांच्याकडील दागिणे तसेच पैसे लूटून नेले आहेत. जखमींवर अहमदनगर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
COMMENTS