दूध उत्पादक शेतकर्यांची दिवाळी बोनस वाटपमुळे गोड पारनेर | नगर सह्याद्री उद्योजक मच्छिंद्र लंके यांच्या कन्हैया दुधामुळे दुध उत्पादक शेतकर...
दूध उत्पादक शेतकर्यांची दिवाळी बोनस वाटपमुळे गोड
पारनेर | नगर सह्याद्री
उद्योजक मच्छिंद्र लंके यांच्या कन्हैया दुधामुळे दुध उत्पादक शेतकर्यांना व दुधाधंदाला नवीन ओळख निर्माण करून शेतीला आधार दिला आहे. तर दूसरीकडे कन्हैया दुधाने दर्जा व गुणवत्ता टिकविल्याने महाराष्ट्रासह देशात नावलौकिक झाला असल्याचे गौरवोद्गार युवा नेते दिपक लंके यांनी टाकळी ढोकेश्वर येथे काढले आहे. टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर मिल्क व मिल्क प्रॉडटच्यावतीने दुध उत्पादक शेतकर्यांना दिवाळी बोनस वाटप व दुध उत्पादक शेतकर्यांचा बुधवारी सन्मान करण्यात आला.
यावेळी दीपक लंके यांच्यासह अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया, माजी पं. स.सदस्य राजेंद्र चौधरी, गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे, सरपंच राहुल झावरे, टाकळी ढोकेश्वर सेवा संस्थेचे अध्यक्ष नारायण झावरे, माजी सरपंच शिवाजी खिलारी, भागुजी झावरे, कन्हैया ऍग्रोचे जनरल मॅनेजर श्रीपाद भट, सत्यम निमसे, पिंटु गोडसे, कन्हैया दुधचे शिवाजी लंके, कैलास डुकरे, योगेश पठारे, अण्णा डुकरे, बाळशिराम पायमोडे, पारनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, श्रावण गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी दीपक लंके म्हणाले की, शेतीला जोडधंदा दुग्ध व्यवसाय मिळाला असून या अतिवृष्टीत शेतकरी किमान दुध धंदामुळे आर्थिक हातभार मिळाला आहे. तसेच अशा अडचणीच्या काळात ढोकेश्वर मिल्क व मिल्क प्रॉडटच्या वतीने दुध उत्पादक शेतकर्यांना दिवाळी बोनस वाटप व दुध उत्पादक शेतकर्यांचा बुधवारी सन्मान करण्यात आला आहे तो कौतुकास्पद आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे राज्यसरकारने किमान ५० हजार रुपये हेटरी मदत तातडीने खात्यावर जमा करून दिलासा द्यावा अशी मागणी दिपक लंके यांनी केली आहे.
पतसंस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकर्यांना आर्थिक आधार
सध्या शेतीला जोडधंदा म्हणून दूध धंदा नावारूपाला आला असून गायांच्या किंमती ह्या लाखाच्या घरात गेलेले आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना दुधाळ जनावरे घेण्यासाठी श्री ढोकेश्वर पतसंस्था व गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्था व डीएनएस पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन या कार्यक्रमादरम्यान अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया, गुरुदत्तचे अध्यक्ष बा.ठ. झावरे व डीएनएसचे अध्यक्ष नारायण झावरे यांनी दिली आहे. तर ही लाख मोलाची जनावरे सांभाळत असताना त्यांचा विमा पण आवश्यक असल्याचेही अशोक कटारिया यांनी आवर्जून सांगितले.
COMMENTS